शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; डिसेंबर महिन्यातील ‘या’ तारखेला अतिरिक्त सुट्टी जाहीर, GR जारी…

Published on -

Mumbai News : महाराष्ट्र राज्य शासनाने डिसेंबर महिन्यात आणखी एक स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने या संदर्भातील जीआर नुकताच जारी केला आहे. या नव्या परिपत्रकानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांना वर्ष २०२५ साठी अतिरिक्त स्थानिक सुट्ट्यांची घोषणा करण्यात आली आहे.

शासन शुद्धीपत्रक दि. ७ ऑगस्ट २०२५ नुसार याआधीच नारळी पौर्णिमा (८ ऑगस्ट २०२५) आणि ज्येष्ठ गौरी विसर्जन (२ सप्टेंबर २०२५) या दोन दिवसांच्या स्थानिक सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या होत्या.

त्यानंतर आता आणखी एक महत्वाची स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शासनाने जारी केलेल्या नव्या परिपत्रकात दि. ६ डिसेंबर २०२५ (शनिवार) या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन निमित्य स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यांमधील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांना ही सुट्टी लागू राहणार आहे. अर्थात या दिवशी शालेय विद्यार्थ्यांना तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना तर सुट्टी राहणारच आहे.

शिवाय शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा या सुट्टीचा लाभ मिळणार आहे. ही सुट्टी दिनांक ५ नोव्हेंबर १९५८ मधील तरतुदीचा आधार घेत जाहीर करण्यात आली आहे.

खरेतर, महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी लाखो भाविक मुंबईतील चैत्यभूमीवर उपस्थित राहतात. या मोठ्या जनसमुदायामुळे सार्वजनिक प्रशासन, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्या दृष्टीने विशेष नियोजनाची आवश्यकता असते.

त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय प्रशासनाच्या सुचारू कामकाजासाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शासनाने काढलेले हे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.maharashtra.gov.in उपलब्ध करण्यात आले आहे.

नक्कीच या स्थानिक सुट्टीमुळे मुंबई आणि उपनगरातील सरकारी कार्यालयांना सलग तिसरी अतिरिक्त सुट्टी मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

महापरिनिर्वाण दिन हा सामाजिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याने शासनाने घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह असल्याची प्रतिक्रिया विविध संघटनांकडून व्यक्त होत आहे.

मुंबईसह संपूर्ण राज्यभरातील नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी मोठे महत्त्व असलेला हा दिवस सुरळीत पार पडावा यासाठी शासन सज्ज असून, या सुट्टीच्या घोषणेनंतर संबंधित विभागांनी लगेचच तयारीला सुरुवात केली आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News