पुढील 4-5 वर्षात मुंबई मोठ्या प्रमाणात बदलणार ! राजधानी मुंबईसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितला ‘हा’ खास प्लॅन

मुंबईत गेल्या काही वर्षांमध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. या मोठमोठ्या प्रकल्पांमुळे मुंबईमधील कनेक्टिव्हिटी फारच सुदृढ झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या पाच-सात वर्षात मुंबईत अनेक गोष्टी चेंज होताना आपल्याला पाहायला मिळणार असून याच संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

Published on -

Mumbai News : मुंबईसहीत संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या एका दशकाच्या काळात रस्ते आणि रेल्वेचे नेटवर्क फारच मजबूत करण्यात आले आहे. मुंबई बाबत बोलायचं झालं तर अलीकडील काही वर्षांमध्ये मुंबईला अनेक मोठमोठ्या प्रकल्पांची भेट मिळाली आहे.

यामुळे मुंबईमधील पब्लिक ट्रान्सपोर्ट जागतिक दर्जाचे बनलेले आहे. अलीकडेच मुंबईला कोस्टल रोड प्रकल्पाची भेट मिळाली आहे तसेच शिवडी ते न्हावा शेवा दरम्यान विकसित करण्यात आलेल्या अटलस सेतू प्रकल्पाची सुद्धा मुंबईकरांना भेट मिळाली असून यामुळे मुंबई वेगवान बनलीये.

असे असतानाच आता देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राचे राज्य राजधानी मुंबईसाठी सीएम देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे पुढील चार-पाच वर्षात मुंबईमध्ये काय काय बदल अपेक्षित आहेत याबाबत मुख्यमंत्री महोदयांनी सविस्तर माहिती दिली आहे.

मुंबई मोठ्या प्रमाणात बदलणार !

एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी येत्या चार-पाच वर्षात मुंबईत मोठा बदल अपेक्षित असल्याचे म्हटले असून मुंबईमधील सगळे पब्लिक ट्रान्सपोर्ट एका तिकिटावर येतील अशी मोठी घोषणा सुद्धा त्यांनी केली आहे.

यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी, मुंबईकरांना आगामी काळात एकाच तिकिटावर लोकल, मेट्रो, मोनोरेल, बेस्टने फिरता येईल अशी घोषणा केली, तसेच याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती सुद्धा दिली. तसेच ही सुविधा 1 ते 15 मे दरम्यान मुंबईत सुरू होणार असल्याचे जाहीर केले.

या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी असे सांगितले की, पुढील एका महिन्याच्या काळात म्हणजे 15 जूनच्या आत ही सुविधा एमएमआरमधील सर्व शहरांमध्ये सुद्धा पुरविली जाणार आहे. दरम्यान मुंबईतील या सुविधेसाठीची ट्रायल रन सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

एवढेच नाही तर मुंबईकरांना आम्ही ट्रिप ऑर्गनाइज करून देऊ. म्हणजे, जर तुम्हाला समजा मंत्रालयातून भांडुपला जायचे आहे आणि तुम्ही जर आमच्या एप्लीकेशनमध्ये असे टाकले तर आम्ही तुम्हाला एक ट्रॅव्हल प्लॅन तयार करून देऊ. म्हणजेच मुंबईकरांना कुठून मेट्रो मिळेल आणि कुठून बसने जावे लागणार, कुठून लोकल मिळेल या सर्व गोष्टी मुंबईकरांना या ट्रॅव्हल प्लॅन मधून मिळू शकतील.

सरकारने मुंबईमधील नागरिकांना त्यांच्या घराच्या 500 मीटरच्या अंतरापर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्टची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच मुंबईकरांना जास्त चालावे लागणार नाही पण यासाठी मुंबईमध्ये मेट्रोचे जाळे परिपूर्ण विकसित होणे गरजेचे आहे. मात्र याची सुरुवात येत्या काही दिवसांनी होणार आहे.

यामुळे मुंबईच्या ट्राफिक वर सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळेल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला आहे. कुठलही खाजगी वाहन न घेता लोकांना पब्लिक ट्रान्सपोर्टने एंड टू एंड जाता आलं पाहिजे असा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच त्यांनी, कोस्टल रोड प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. वर्सोवा ते दहिसर आणि दहिसर ते भाईंदर या दोन विस्तारित कोस्टल रोड प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. उत्तन ते विरार असाही कोस्टल रोड विकसित केला जाणार आहे.

पुढील पाच सहा वर्षात मुंबईची वेस्टर्न साईट कम्प्लीटली कोस्टल रोडने कनेक्ट होणार अशी माहिती दिली. सध्या विरार ते मुंबई हा प्रवास करण्यासाठी साडेतीन तास लागतात मात्र ही सर्व प्रस्तावित कामे पूर्ण झाल्यानंतर हा प्रवास अवघ्या 40 ते 45 मिनिटात होईल असं सुद्धा त्यांनी यावेळी स्पष्ट केल.

मुंबईजवळ तिसरी आणि चौथी मुंबई

फडणवीस यांनी अटल सेतू आणि विमानतळाजवळ तिसरी मुंबई तयार होत असल्याची माहिती दिली तसेच चौथी मुंबई वाढवण बंदराजवळ विकसित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वाढवण बंदराजवळ नवीन विमानतळ तसेच बुलेट ट्रेनचे स्टेशन सुद्धा तयार होत आहे.

आणि त्याच ठिकाण पर्यंत कोस्टल रोड सुद्धा जात आहे. सध्या सामान्य माणसांना मुंबईत घर घेणे कठीण आहे पण तिसरी मुंबई आणि चौथी मुंबई तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी सामान्य नागरिकांना घर घेता येणे शक्य होईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाचे म्हणजे नवी मुंबई तिसरी मुंबई किंवा चौथी मुंबई राहत असताना सुद्धा सामान्य नागरिकांना आपण मुंबईतच राहतोय अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीची कनेक्टिव्हिटी तयार करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

एवढेच नाही तर नवी मुंबईत दहा जागतिक दर्जाच्या टॉप 100 रँक मधील युनिव्हर्सिटीज आणल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले असून या अनुषंगाने आवश्यक कारवाई सुद्धा सुरू करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी त्यांनी धारावी बाबत सुद्धा मोठी घोषणा केली.

धारावी अर्थातच आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी मात्र मुंबईला आपल्याला आगामी काळात झोपडपट्टीमुक्त म्हणजेच स्लम फ्री बनवायचे आहे असे यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News