Mumbai News : मुंबईकरांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईला आणखी एका नव्या वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सध्या मुंबईवरून सहा वंदे भारत ट्रेन सुरू आहेत. यातील 2 गाड्या मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून धावत आहेत आणि चार गाड्या सीएसएमटी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून सुरू आहेत.

सीएसएमटी ते सोलापूर सीएसएमटी ते शिर्डी सीएसएमटी ते जालना सीएसएमटी ते मडगाव आणि मुंबई सेंट्रल ते गांधीनगर मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद अशा सहा गाड्या सध्या सुरू आहेत. मात्र या सर्व गाड्या चेअर कार प्रकारातील आहेत. पण, आता मुंबईला वंदे भारत स्लीपर ट्रेनची भेट मिळणार असल्याची बातमी हाती आली आहे.
कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन?
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते बरेली या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जर रेल्वेच्या नियोजनानुसार सर्व काही सामान्य राहिले तर वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या दोन महिन्यांनी म्हणजेच जुलैपासून सुरु होऊ शकते.
ही वंदे भारत स्लीपर ट्रेन साप्ताहिक राहणार आहे म्हणजेच आठवड्यातून एक दिवस चालवली जाईल. ही ट्रेन दोन्ही बाजूंनी बरेली, चंदईसी, अलीगड अशी चालवली जाऊ शकते. ही ट्रेन बरेली, अलीगड ते आग्र्याहून मुंबईला येणार आहे.
यामुळे प्रवाशांचा प्रवास खूप आरामदायक होईल असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त केला जातोय. बरेली, अलीगड या भागातील रेल्वे प्रवासी गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईसाठी हाय स्पीड ट्रेन सुरू करायला हवी अशी मागणी करत होते आणि याच मागणीच्या अनुषंगाने आता रेल्वे कडून वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यासाठी हालचाली वाढवण्यात आल्यात अशी माहिती समोर येत आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन साठी रेल्वे कडून तयारी सुरू
उत्तर मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शशिकांत त्रिपाठी यांनी याबाबत मोठी माहिती दिलेली आहे. या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्यासाठी हालचाली तीव्र झाले आहेत आणि रेल्वे कडून टेस्टिंग सुद्धा सुरू करण्यात आली असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे.
सध्या स्थितीला जर अलीगडहून मुंबईपर्यंत प्रवास करायचा असेल तर प्रवाशांना बरेली – लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या रेल्वे गाडीने प्रवास करावा लागतो. गाडी क्रमांक 14314-13 बरेली-लोकमान्य टिळक टर्मिनस-बेरेली एक्सप्रेस ही एक साप्ताहिक ट्रेन आहे आणि या गाडीवर प्रवाशांचा मोठा दबाव सुद्धा पाहायला मिळतो.
या ट्रेनने प्रवास करण्यासाठी, एखाद्याला कमीतकमी दोन महिने अगोदर तिकीट बुकिंग करावी लागते. याच पार्श्वभूमीवर बरेली ते मुंबई पर्यंत वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची रेल्वेची योजना असल्याची बातमी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
बरेली ते मुंबई या मार्गावर वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू होणार हे जरी नक्की असले तरी देखील ही गाडी कधीपर्यंत सुरू होऊ शकते याबाबत अजून अधिकाऱ्यांकडून कोणतीचं माहिती देण्यात आलेली नाही.