मुंबईकरांसाठी आनंदवार्ता! पाच वर्षांपासून बंद असलेला ‘हा’ पूल ‘या’ दिवशी पुन्हा सुरु होणार, चाकरमान्यांचा प्रवास होणार जलद

mumbai news

Mumbai News : मुंबईकरांसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरं पाहता राजधानी मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण तसेच राज्य रस्ते विकास महामंडळ आणि इतर तत्सम प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई आणि उपनगरात रस्ते विकासाची कामे जलद गतीने सुरू आहेत. रस्ते विकासासोबतच लोहमार्ग जाळे विस्तार करण्यासाठी देखील प्रयत्न होत आहेत.

वंदे भारत एक्सप्रेसच्या धरतीवर वंदे लोकल सुरू करण्याचा मानस आहे. एवढेच नाही तर मेट्रोचे जाळे देखील मुंबई शहरात विस्तारू लागले आहे. दरम्यान आता गेल्या पाच वर्षांपासून बंद पडलेल्या डेलिझल पुलाबाबत एक मोठी अपडेट आमच्या हाती आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे डेलिझल पूल हा राजधानी मुंबई मधील वेगवेगळ्या भागातून लोअर परेल मध्ये जाणाऱ्या नागरिकांसाठी अति महत्त्वाचा आहे.

हे पण वाचा :- द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी खुशखबर! विकसित झालं द्राक्षाचे नवीन वाण; ‘हे’ आहेत याचे वैशिष्ट्ये

मात्र पाच वर्षांपूर्वी 2018 मध्ये आयआयटी बॉम्बे च्या तांत्रिक तज्ञांनी हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल सादर केला होता. यानंतर मग हा पूल बंद करण्यात आला आणि या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. आता महापालिकेत कार्यरत असलेल्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या पुलाबाबत एक मोठी माहिती दिली आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पुलाचे काम एकूण तीन टप्प्यात सुरू आहे. पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून ऑक्टोबर 2023 पर्यंत हा पुल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अधिकाऱ्यांच्या मते महापालिका आणि रेल्वे यांच्या माध्यमातून संयुक्तरीत्या या पुलाची पुनर्बांधणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हे पण वाचा :- नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना; शेतकऱ्यांनो, योजनेसाठी अर्ज करताना ‘ही’ कागदपत्रे लागणार, वाचा सविस्तर

म्हणजेच रेल्वेचा आणि महापालिकेचा हा एक संयुक्त प्रकल्प आहे. आता याची पुनर्बांधणी रेल्वे आणि महापालिकेच्या माध्यमातून होत असून रेल्वे रुळांच्या वरचा भाग रेल्वेकडून पाडला जात आहे. तर पालिकेकडून मार्ग आणि रॅम्प उभारणीचे काम सुरू आहे.

दरम्यान पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर इतर कामे करण्याचे नियोजन असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. निश्चितच ऑक्टोबर 2023 पर्यंत या पुलाचे काम पूर्ण होणार असून वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने मुंबईमधील विविध भागातील नागरिकांना लोवर परळमध्ये जाताना मोठा याचा फायदा होणार आहे. 

हे पण वाचा :- कौतुकास्पद! शारीरिक अपंगत्व असतानाही शेतीमध्ये केला नवखा प्रयोग; एका एकरात ‘या’ जातीच्या टरबूज पिकातून…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe