Mumbai News : मुंबई आणि नवी मुंबई या दोन शहरांसाठी अति महत्त्वाचा अशा मुंबई ट्रांस हार्बर लिंक प्रकल्पाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. खरं पाहता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मुंबई ते नवी मुंबई हा प्रवास गतिमान करण्यासाठी मुंबई ट्रान्स हार्बर लींक या प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे.
या प्रकल्पांतर्गत 21.81 किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूचे निर्माण केले जात आहे. हा सागरी सेतू शिवडी ते न्हावाशेवा दरम्यान तयार केला जात आहे. आता या मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. यामुळे आता या सागरी सेतूवरून मालवाहतूक वाहने धावणार आहेत.
म्हणून आता या मार्गावरून बांधकाम साहित्य घेऊन जाणे सोयीचे होणार आहे. या मार्गाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने बुधवारी एका विशेष कार्यक्रमाचे देखील आयोजन एमएमआरडीएने केले आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत.
हे पण वाचा :- मोठी बातमी ! मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेनला कोकणातील ‘या’ महत्त्वाच्या रेल्वेस्थानकावरही थांबा मिळणार? पहा….
आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कडून नुकत्याच काही दिवसापूर्वी या प्रकल्पातील शेवटच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचे काम पूर्ण करण्यात आले आहे. आता सागरी पुलाचे बांधकामही पूर्ण झाले आहे. यामुळे या प्रकल्पाचा एक अति महत्त्वाचा टप्पा यानिमित्ताने पूर्ण झाला आहे.
हे काम पूर्ण झाल्याने आता मुंबई आणि मुख्यभूमी अर्थात शिवडी ते चिर्ले भाग एकमेकांशी जोडला गेला आहे. परिणामी आता या सागरी सेतू वर वाहतूक शक्य होणार आहे. त्यामुळे बांधकाम साहित्यांची वाहतूक सोपी होणार असून या प्रकल्पाच्या पुढील कामाला गती मिळणार आहे.
कसा आहे प्रकल्प?
हे पण वाचा :- बारावी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! ICMR मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, पहा डिटेल्स
हा प्रकल्प मुंबई आणि नवी मुंबई यांना जोडणारा असून यामुळे मुंबई ते नवी मुंबई चा प्रवास मात्र वीस मिनिटात पूर्ण करता येणार आहे. यामुळे मुंबईकर गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा म्हणून वाट पाहत आहेत.
या प्रकल्पांतर्गत 21.81 किलोमीटर लांबीचा सागरी सेतू तयार केला जात असून या सागरी सेतू पैकी जवळपास साडेसोळा किलोमीटर अंतर हे समुद्रावरून जात आहे तर उर्वरित अंतर हे जमिनीवर आहे.
दरम्यान आता या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने यावरून वाहतूक शक्य झाली आहे. म्हणून आता या प्रकल्पाच्या तांत्रिक, टोलसंबंधीच्या कामाला देखील मोठी गती मिळणार असून ही कामे पूर्ण करणे सोपे होणार आहे.
दरम्यान या प्रकल्पाचे संपूर्ण काम यावर्षी अखेर पूर्ण करण्याचा मानस एमएमआरडीएचा आहे. अर्थातच डिसेंबर 2023 पर्यंत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे. यामुळे निश्चितच मुंबईकरांना आणि नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हे पण वाचा :- रेशन दुकानदाराने रेशन देण्यास नकार दिला किंवा कमी धान्य दिले तर ‘या’ नंबरवर करा तक्रार, कडक कारवाई होणार