Mumbai News : मुंबईहुन कोकणात अन गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही मुंबईहून कोकणात केव्हा गोव्याला प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक फायद्याची ठरणार आहे. कारण आता मुंबई ते गोवा प्रवास आणखी सोयीस्कर होणार असल्याचे बोलले जात आहे.
सध्या मुंबई गोवा प्रवास फारच आव्हानात्मक बनलाय. कारण मुंबई गोवा महामार्गाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. या महामार्गाचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून सुरू आहे मात्र अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही आणि यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना नेहमीच आव्हानांचा सामना करावा लागतो.

खरेतर, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या नेहमीच अधिक असते. गणेशोत्सवाच्या काळात तर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. यावर्षी देखील गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय राहील असे बोलले जात आहे.
दरम्यान नेहमीप्रमाणे यंदाच्या गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा रेल्वे आणि एसटीचे तिकीट मिळवणे कठीण होणार आहे. पण आता यावर उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने एक नवा पर्याय सुचवला आहे तो म्हणजे रो-रो बोट सेवा. राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाने मुंबई ते गोवा दरम्यान रो-रो सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे. या सेवेमुळे प्रवासी त्यांच्या स्वतःच्या वाहनांसह सहज प्रवास करू शकतील. दरम्यान आता आपण या रो-रो बोट सेवेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कशी असणार रो-रो बोट सेवा
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील माझगाव डॉक येथून ही बोट सेवा सुरू होणार आहे. मुंबई येथील माझगाव येथून ही बोट सुरु होईल अन या बोटीतून प्रवाशांना थेट कोकणातील देवगड किनाऱ्यावर उतरता येणार आहे. या रो-रो बोट सेवेमुळे मुंबई ते कोकण हा प्रवास फक्त साडेचार तासात पूर्ण होणार आहे.
या नव्या प्रवासी साधनांमुळे मुंबईहून देवगडपर्यंत सुमारे साडेचार तासांत पोहोचता येणे शक्य होईल असा दावा केला जातोय. तसेच या सेवेमुळे गोव्यापर्यंत पोहोचण्यासाठी साधारण साडेसहा तास लागतील.
एकंदरीत यामुळे मुंबईहून कोकणात आणि गोव्यात जाणाऱ्यांचा प्रवास वेगवान होणार असून याचा गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल, ही सेवा या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
रेल्वे आणि एसटी प्रवासाच्या तुलनेत हा एक जलद आणि आरामदायक प्रवास ठरणार असल्याचा दावा केला जातोय. कोकणातील प्रवासी राज्य सरकारच्या या निर्णयामुळे गणेशभक्तांना मोठा दिलासा मिळेल असे मत व्यक्त करताना दिसत आहेत.
सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी या नव्या सेवेसंदर्भात माहिती देताना सांगितले की, यामुळे गणेश चतुर्थीच्या काळात प्रवासाचा अनुभव अधिक सुकर होईल. मात्र या सेवेची घोषणा करण्यात आली असली तरी देखील प्रत्यक्षात आता ही सेवा कधी सुरू होते आणि गणेशोत्सवाच्या आधी प्रवाशांसाठी खुली होते का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. यामुळे या रो-रो सेवेकडे कोकणवासीयांचे विशेष लक्ष राहणार आहे.