केंद्रीय रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी चालवली जाणार सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन, प्रवाशांची तीस वर्षांची मागणी पूर्ण

Published on -

Mumbai News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अगदीच महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे मुंबईवरून लवकरच एक नवीन सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नुकताच हा निर्णय घेतला असून यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांची 30 वर्षांची मागणी मान्य करत बंगळूर आणि मुंबईदरम्यान नवी सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.

खासदार तेजस्वी सुर्या यांनी केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या या निर्णयाची माहिती दिली आहे. नक्कीच रेल्वेने घेतलेला हा निर्णय दोन्ही महानगरातील प्रवाशांसाठी महत्वाचा राहणार आहे.

या सुपरफास्ट रेल्वेसाठी गेल्या तीन दशकांपासून मागणी उपस्थित केली जात होती. अखेरकार आता रेल्वेने मुंबई – बेंगलोर दरम्यान सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन चालवण्यास मान्यता दिली आहे.

अश्विनी वैष्णव यांनी स्वतः अस आश्वासन दिलय. खरेतर ह्या मार्गांवर उद्यान एक्सप्रेस सुरु आहे. पण या गाडीला संपूर्ण प्रवासासाठी 24 तासांचा वेळ लागतो. त्यामुळे प्रवाशांना विमान वा बसेसचाच आधार घ्यावा लागत होता.

पण आता नवीन सुपरफास्ट रेल्वे गाडी चालवण्यास मान्यता मिळाली आहे. या नव्या रेल्वेच्या मंजुरीसाठी संसदेत सार्वजनिक लेखा समितीच्या बैठकीत तसेच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत सातत्याने प्रयत्न करण्यात आले.

अखेर आता रेल्वे मंत्रालयाकडून मुंबई बेंगलोर सुपरफास्ट रेल्वे सुरू होणार आहे. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होणार आहे. विमान आणि बसेसना ही रेल्वे एक विश्वासार्ह पर्याय ठरेल.

या निर्णयामुळे व्यापारी, विद्यार्थी आणि कामगार यांना मोठा दिलासा मिळेल. तेजस्वी सूर्या यांनी या स्वप्नपूर्तीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांचे विशेष आभार मानले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe