Mumbai News : गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई शहराचा विस्तार झपाट्याने झाला आहे. यामुळे आता तिसऱ्या मुंबई नंतर पालघर मध्ये चौथी मुंबई सुद्धा विकसित होणार आहे. दरम्यान शासनाच्या याच महत्त्वाकांक्षी प्रकल्प बाबत आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. खरेतर, कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाढवण येथे देशातील सर्वात मोठ्या बंदराची उभारणी करण्यात येत आहे.
वाढवण बंदर देशातील सर्वात मोठे बंदर तर असेलच शिवाय याचा जगातील टॉप 10 बंदरांमध्ये समावेश होणार आहे. यामुळे या ठिकाणी विकासाच्या मोठ्या संधी उपलब्ध राहतील. दरम्यान आता याच वाढवण बंदराभोवती ‘चौथी मुंबई’ नावाने एक नव्या शहराचा विकास केला जाणार आहे.

कसा असणार प्रकल्प ?
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारने वाढवण विकास केंद्राच्या क्षेत्रात मोठी वाढ केली आहे. सुरवातीला या प्रकल्पा अंतर्गत अकरा गावांमध्ये विकास केंद्र विकसित केले जाणार होते. पण आता 11 ऐवजी 96 गावांचा समावेश करण्यात आला आहे.
यामुळे चौथ्या मुंबईचे क्षेत्र सुद्धा आता वाढले आहे. चौथ्या मुंबईचे क्षेत्र आता थेट 512 चौरस किमीवर पोहोचले आहे, यामुळे इथे विकासाच्या संधी सुद्धा अधिक राहणार आहेत. या बंदरामुळे पालघर आणि आजूबाजूच्या परिसरात औद्योगिक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणात विकासाची संधी उपलब्ध होणार आहेत.
वाढवण बंदर हे जगातील पहिल्या 10 मोठ्या बंदरांमध्ये सुद्धा स्थान मिळवणार आहे. याच अनुषंगाने एमएसआरडीसीच्या अर्थातच राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून इथे ‘वाढवण विकास केंद्र’ पोर्ट सिटी विकसित केली जाणार आहे.
यालाच सरकारने चौथी मुंबई असे म्हटले आहे. वाढवण विकास केंद्राचे नियोजन हे अगदीच आंतरराष्ट्रीय दर्जाचे राहणार अशी माहिती देण्यात आली आहे. या ठिकाणी बंदर, औद्योगिक क्षेत्र, कंटेनर डेपो, लॉजिस्टिक हब, रस्ते, वाहतूक, निवासी व व्यापारी वसाहती, शाळा, महाविद्यालये, रुग्णालये यांचा समावेश करण्यात येणार आहे.
सध्या राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या भागाचा आराखडा व विकास योजना तयार केली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आगामी काळात या प्रकल्पाचा प्रत्यक्षात आराखडा तयार होईल आणि त्यानंतर मग या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरू होईल असे म्हटले जात आहे.
वाढवण विकास केंद्र किंवा चौथी मुंबई या प्रकल्पामुळे पालघर आणि आसपासच्या भागाला एक वेगळे वैभव प्राप्त होणार आहे. यामुळे हा भाग एका नव्या ओळखीने महाराष्ट्राच्या नकाशावर झळकणार आहे.
कोकणातील ह्या 19 ठिकाणी विकास केंद्र उभारली जाणार
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने केवळ वाढवणच नव्हे, तर कोकणातील एकूण 19 ठिकाणी विकास केंद्रे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यात 699 गावांमध्ये 2985 चौरस किमी क्षेत्राचा समावेश राहणार आहे.
वाढवण, मालवण, लोणेरे , हरिहरेश्वर, केळवट, हर्णे, भाट्ये, बांदा केळवा , रोहा, न्हावे, माजगाव, दिघी, देवके, दोडावन, आंबोळगड, नवीन गणपतीपुळे, रेडी, नवीन देवगड ह्या ठिकाणी विकास केंद्र तयार होणार आहे. यामुळे खऱ्या अर्थाने कोकणातील एकात्मिक विकासाला चालना मिळेल असा विश्वास व्यक्त होतोय.