मुंबईत तयार होतोय सर्वात महागडा स्कायवॉक ! कुठे विकसित होतोय सर्वाधिक मोठा आणि महागडा स्कायवॉक ? पहा…

Mumbai News : मुंबईत आतापर्यंतचा सर्वात महागडा स्कायवॉक विकसित होत आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईतल्या या प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट समोर आल आहे. खरे तर या प्रकल्पाचा खर्च 17 कोटी रुपयांनी वाढल्याची बाब समोर आली आहे आणि म्हणूनच हा मुंबईतील सर्वात मोठा अन महागडा स्कायवॉक ठरू शकतो अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत. वाढलेल्या खर्चामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला असून आज आपण याच प्रकल्पाबाबत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. हा प्रकल्प नेमका कुठे उभारला जातोय, या प्रकल्पाचा खर्च वाढण्यामागील नेमके कारण काय याच संदर्भातील आढावा आज आपण या लेखातून घेणार आहोत.

कुठे तयार होतोय सर्वात महागडा स्काय वॉक 

देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईतील वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते म्हाडा कार्यालयापर्यंत हा स्काय वॉक उभारला जातोय. हा वांद्रे पूर्व येथे उभारला जाणारा स्कायवॉक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. खरे तर या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या काही दिवसांनी हा संपूर्ण प्रकल्प बांधून तयार होणार असे. पण असे असतानाच प्रकल्पाचा खर्च जवळपास 17 कोटी रुपयांनी वाढल्याची बाब समोर आली आहे. खरं तर हा प्रकल्प जेव्हा मंजूर करण्यात आला तेव्हा यासाठी 106 कोटी रुपयांचा खर्च होणार अशी माहिती देण्यात आली होती. मात्र आता खर्च 17 कोटी रुपयांनी वाढून प्रकल्प खर्च 123 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे हा मुंबईतील सर्वांत महागडा स्कायवॉक ठरणार अशी माहिती दिली जात आहे. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर याचे काम मुंबई महापालिकेमार्फत केले जात आहे. पण, या पुनर्बाधणीच्या कामात जलवाहिन्या आणि पर्जन्यजलवाहिन्यांचे स्थलांतर करावे लागत आहे. यामुळे याचा खर्च वाढल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. स्कायवॉकसाठी जेव्हा खांब उभारणी सुरू झाली तेव्हा 2400 मिमी व्यासाची मोठी जलवाहिनी आढळून आली. यामुळे खांबाची जागा बदलावी लागली. त्यानंतर परत 300 mm व्यासाची जलवाहिनी दिसली मात्र ही छोटी जलवाहिनी असल्याने या जलवाहिनीला स्थलांतरित करण्यात आले. पुढे काम करताना परत 1800 मीमी व्यासाच्या तीन जलवाहिन्या आढळल्यात. यामुळे पायाचे काम करणे अशक्य ठरले. याचाच परिणाम म्हणून या प्रकल्पातून जवळपास 70 मीटरचा भाग वगळण्यात आला. या प्रकल्पात झालेल्या बदलामुळे स्कायवॉकवरील सरकत्या जिन्यांच्या उभारणीत सुद्धा बदल झाला. पर्जन्यजलवाहिनीच्या अडथळ्यांमुळे रचना बदलावी लागली असून, प्रवाशांच्या सोयीसाठी आता अतिरिक्त जिन्यांचीही तरतूद करण्यात येत आहे. या सर्व तांत्रिक बदलांमुळे आणि अतिरिक्त कामांमुळे खर्चात मोठी वाढ झाली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की हा स्कायवॉक मुंबईतील पहिला स्कायवॉक म्हणून ओळखला जातो. एमएमआरडीएने हा प्रकल्प 2008 मध्ये उभारला होता. पुढे या प्रकल्पाचे हस्तांतरण महापालिकेकडे करण्यात आले. मात्र हा प्रकल्प 2019 मध्ये असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आणि यानुसार जुना स्कायवॉक पाडून नवीनच स्काय वॉक बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रकल्प आता जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतोय. 31 डिसेंबर पर्यंत या प्रकल्पाचे काम करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. अर्थात नव्या वर्षात हा प्रकल्प मुंबईकरांसाठी सुरू होऊ शकतो आणि यामुळे वांद्रे रेल्वे स्थानक ते माढा कार्यालय यादरम्यान ये – जा करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.