फडणवीस सरकारकडून मुंबईकरांना आणखीन एक मोठे गिफ्ट ! 15 एप्रिल 2025 रोजी सुरू होणार ‘या’ मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा

मुंबईकरांना लवकरच आणखी एका नव्या मेट्रोमार्गाची भेट मिळणार आहे. शहरातील मेट्रो लाईन 3 च्या या दुसऱ्या टप्प्यांत बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत भूमिगत मेट्रो धावणार आहे. या मेट्रोमार्गामुळे शहरातील अनेक भागांमध्ये वाहतूक कोंडीचे प्रमाण कमी होणार आहे. हा मेट्रो मार्ग येत्या सात-आठ दिवसानंतर कधीही सुरू होण्याची शक्यता आहे.

Published on -

Mumbai News : महायुती सरकारकडून अन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबईकरांना लवकरच एक मोठ गिफ्ट मिळणार आहे. महायुती सरकारचे लवकरच 100 दिवस पूर्ण होणार आहेत अन याच पार्श्वभूमीवर मुंबईकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक मोठी भेट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला आणखी एका मेट्रो मार्गाचे गिफ्ट मिळणार आहे. शहरातील एक्वा लाईन म्हणजेच मेट्रो-3 च्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण येत्या सहा-सात दिवसानंतर कधीही होऊ शकते, असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये करण्यात आला आहे.

या मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण 10 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली असुन आज आपण या मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याची महत्त्वपूर्ण माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा आहे हा मेट्रो मार्ग?

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या या मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचे अंतिम काम सुरू असून, पुढील आठवड्यात सीएमआरएस (कमिश्नर ऑफ मेट्रो रेल सेफ्टी) इन्स्पेक्शन होणार आहे. हे निरीक्षण यशस्वी झाल्यानंतर नेमके उद्घाटन कधी होणार याची तारीख डिक्लेअर केले जाईल असे सांगितले जात आहे.

अजून या मेट्रो मार्गाच्या दुसऱ्या टप्प्याचा लोकार्पणाचा अधिकृत दिवस निश्चित झालेला नाही. मात्र प्रशासनाने या प्रक्रियेस गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

उर्वरित फायर एनओसी आणि सीएमआरएस सर्टिफिकेट सुद्धा लवकर मिळावे, यासाठी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन जोरदार हालचाल करत आहे. मात्र, जर सर्व आवश्यक प्रमाणपत्रे वेळेत मिळाली, तर 10 ते 15 एप्रिल दरम्यान हा टप्पा कार्यान्वित होईल.

मेट्रो मार्गाचा दुसरा टप्पा कसा राहणार?

मुंबईमधील मेट्रो लाईन तीनच्या या दुसऱ्या टप्प्यांत बीकेसी ते आचार्य अत्रे चौकापर्यंत भूमिगत मेट्रो धावणार आहे. बीकेसीसह या मार्गावर एकूण सहा स्थानके असतील.

यामध्ये धारावी, शितलादेवी, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य अत्रे चौक या स्थानकांचा समावेश राहणार आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.

या मार्गाच्या सुरू होण्याने मध्य मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल शिवाय या परिसराचा एकात्मिक विकास सुनिश्चित होईल.

या मेट्रोमार्गामुळे रस्त्यांवर होणारा वाहतुकीचा ताण कमी होईल, तसेच प्रवाशांना वेगवान आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe