Mumbai News : मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात आणि उपनगरात नागरिकांच्या सोयीसाठी वेगवेगळी विकासाची कामे केली जात आहेत. वास्तविक गेल्या काही दशकांपासून शहरात आणि उपनगरात वाहनांची वाढत्या संख्येमुळे आणि वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक कोंडी एक कॉमन विषय बनला आहे.
शहरातील अनेक भागात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना प्रवास करताना अगदी तारेवरची कसरत करावी लागत आहे. यामध्ये मालाड पश्चिम लिंक रोडवर देखील कायमच ट्रॅफिक ची समस्या पाहायला मिळाली आहे.
विशेषतः मीठ चौकी परिसरात वाहतूककोंडी अधिक होत आहे. यामुळे या भागातील वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांच्या माध्यमातून महापालिकेकडे करण्यात आली होती.
हे पण वाचा :- मोचा चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा गंभीर इशारा
स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून देखील ही मागणी लावून धरण्यात आली होती. महापालिका देखील यासाठी प्रयत्न करत होती. दरम्यान आता या परिसरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून एक नवीन फ्लाय ओव्हर तयार केला जाणार आहे.
मालाड पश्चिम येथील लगून रोड ते इन्फिनिटी मॉलपर्यंत हा नवीन फ्लाय ओवर विकसित होणार आहे. विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने या फ्लाय ओव्हरच्या कामाला मान्यता देखील दिली आहे.
वास्तविक, उड्डाणपुलाची मागणी रहिवाशांच्या माध्यमातून गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केली जात होती. अखेरकार आता स्थानिक रहिवाशांची ही मागणी लक्षात घेऊन मालाड पश्चिम येथील लगून रोड ते इन्फिनिटी मॉलपर्यंत 380 मीटर लांबीचा आणि 36.06 मीटर रुंदीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे.
हे पण वाचा :- राज्यातील महिलांसाठी महत्वाची बातमी ; एसटीच्या हाफ तिकीटाबाबत एसटी महामंडळाने केले ‘हे’ महत्वाचे काम, आता….
महापालिकेकडून हा पुल विकसित केला जाणार असून यामुळे लिंक रोड ते मालवणी परिसर थेट जोडला जाणार आहे. परिणामी लिंक रोडवरील वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार असल्याचा आशावाद व्यक्त होत आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या लगून रोड ते इन्फिनिटी मॉलदरम्यान प्रवास करण्यासाठी प्रवाशांना जवळपास दोन तासांचा कालावधी खर्च करावा लागत आहे. खरं पाहता, हे अंतर अधिक नाही मात्र वाहतूक कोंडीमुळे हे अंतर पार करण्यासाठी प्रवाशांना खूप मेहनत घ्यावी लागत आहे.
मात्र आता हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर हे अंतर केवळ पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण करता येणार आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांच्या माध्यमातून महापालिकेच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे. दरम्यान आता हा उड्डाणपूल केव्हा तयार होतो? याकडे या परिसरातील नागरिकांचे विशेष लक्ष लागून राहणार आहे.
हे पण वाचा :- पुणे, मुंबईकरांसाठी खुशखबर ! ‘या’ मार्गामुळे Pune-Mumbai प्रवासातील अंतर 45 मिनिटांनी होणार कमी, केव्हा होणार सुरु? पहा….