Mumbai News : मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी. मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र आहे. मुंबईत आपल्याला सर्वच प्रमुख कंपन्यांचे मुख्यालय पाहायला मिळतात. देशातील प्रमुख बँकांचे मुख्यालय देखील मुंबईत स्थित आहे. आरबीआयचे मुख्यालय देखील मुंबईतच आहे.
याव्यतिरिक्त इतरही अनेक छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत ज्यांचे मुख्यालय आपल्याला मुंबईत दिसतात. हेच कारण आहे की मुंबई भारतातील सर्वाधिक श्रीमंत शहर म्हणून ओळखले जाते. श्रीमंती सोबतच मुंबई आपल्या लोकसंख्येसाठी सुद्धा ओळखले जाते. मुंबईतील लोकसंख्येची घनता जगातील इतर शहरांपेक्षा सर्वाधिक आहे.

मात्र असे असले तरी आजही मुंबईतील लोकसंख्या वाढतच आहे. यामुळे मुंबईला मायानगरी, स्वप्ननगरी, बॉलीवूडनगरी अशा विविध नावाने ओळखले जाते. पण तुम्हाला या मायानगरीमधील सर्वाधिक महागडे परिसर कोणते आहेत याची माहिती आहे का? नाही ना मग आता आपण याच मायानगरीमधील सर्वाधिक महागड्या टॉप 5 परिसरांची माहिती जाणून घेऊयात.
ताडदेव : दक्षिण मुंबईतील ताडदेव हा परिसर या यादीत पाचव्या क्रमांकावर येतो. हा मुंबईमधील एक पॉश परिसर आहे. याच भागात आशिया खंडातील तसेच देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती अर्थातच मुकेश अंबानी यांचे घर आहे. मात्र इथे सध्या स्थितीला घरांचे फारसे विकल्प उपलब्ध नाहीत.
वांद्रे : मुंबईतील बहुतांशी प्रसिद्ध व्यक्ती तुम्हाला या परिसरात आढळतील. विशेषतः वांद्रे पश्चिम हा परिसर कलाकार, साहित्यिक लोकांसाठी ओळखला जातो. हा परिसर विविध अब्जाधीश लोकांनी भरलेला आहे.
इथे किंग खान म्हणजेच शाहरुख खान आणि भाईजान म्हणजेच सलमान खान यांचे सुद्धा बंगले आहेत. त्यामुळे अनेकजण या भागात घर खरेदीचे स्वप्न पाहतात पण येथील घरांच्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरील आहेत.
कफ परेड : मुंबईतील कफ परेड हा परिसर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या भागात तुम्हाला उंचच – उंच इमारती पाहायला मिळतील. इथे अनेक कमर्शियल आणि रेसिडेन्शिअल इमारती आहेत. वर्ल्ड ट्रेड आणि ताज प्रेसिडेंट हॉटेल यांसारख्या प्रसिद्ध इमारती तुम्हाला याच भागात पाहायला मिळतील.
मालाबर हिल्स : दक्षिण मुंबई मधील सर्वाधिक पॉश आणि श्रीमंत परिसर म्हणजे मालाबार हिल्स. येथे तुम्हाला अनेक श्रीमंत लोक पाहायला मिळतील. शहरातील सर्वच श्रीमंत लोकांचा इथे तुम्हाला वावर दिसेल. या यादीत हा परिसर दुसऱ्या क्रमांकावर येतो. हा शहरातील एक महागडा परिसर आहे.
जुहू : या यादीत जुहू परिसराचा पहिला नंबर लागतो. इथे बॉलीवूडमधील अनेक कलाकारांची घरे तुम्हाला दिसतील. म्हणूनच हा मुंबईतील सर्वाधिक महागडा परिसर म्हणून ओळखला जातो.