मराठवाड्यातील नागरिकांचा मुंबईकडील प्रवास होणार सुसाट; ‘हा’ नवीन मार्ग होणार तयार, शिरूरमधील वाहतुकीला पण होणार फायदा, पहा संपूर्ण रूटमॅप

Published on -

Mumbai News : मराठवाड्यातील नागरिकांना आता मुंबईमध्ये जाणे अजूनच सोपे होणार आहे. खरं पाहता सध्या स्थितीला उपलब्ध असलेल्या मार्गावरून मराठवाड्याहून मुंबईकडे जाणे खूपच अवघड बनले आहे.

कारण की प्रवाशांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसत आहे. मुंबई ही राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. परिणामी मराठवाड्यातून रोजाना हजारो प्रवासी रस्ते मार्गे राजधानी मुंबईला जात असतात.

मराठवाड्यातील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी सध्या चाकण-शिक्रापूर-तळेगाव या मार्गे जावे लागते. मात्र चाकण आणि शिरूर येथे असलेल्या एमआयडीसी मुळे या नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होते.

यामुळे या रस्त्यावर कायमच वाहतूक कोंडी होत असते. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करून मराठवाड्यातील नागरिकांना मुंबईमध्ये जलद गतीने जाता यावे यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने एक मोठा पुढाकार घेतला आहे.

हे पण वाचा :- पंजाब डख : महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता; मे अन जून महिन्यात कसं राहणार हवामान? वाचा डख यांचा सविस्तर हवामान अंदाज

आता मराठवाड्यातील नागरिकांना पुणे मार्गे मुंबईला जाण्यासाठी शिरूर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या रस्त्यामुळे मराठवाड्यातील तसेच शिरूर मधून येणाऱ्या प्रवाशांना मुंबईमध्ये जाण्यासाठी नवीन मार्ग उपलब्ध होणार आहे.

परिणामी मुंबई पुणे महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल असा आशावाद व्यक्त होत आहे. शिवाय या नवीन मार्गामुळे मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मुंबईचं अंतर कमी होणार आहे.

अर्थातच या नवीन मार्गामुळे मराठवाड्याच्या दिशेकडून पुण्यात येणारी वाहतूक शिरूर खेड मार्गे थेट कर्जतला जाऊ शकणार आहे. कर्जतहून पुढे मग पनवेल-उरणला हा नवीन मार्ग जोडला जाणार आहे.

हे पण वाचा :- पुणे-नासिक हायस्पीड रेल्वेला रेल्वे मंत्रालयाची परवानगी केव्हा मिळणार, प्रकल्पाची सद्यस्थिती काय? पहा….

कसा असणार बरं नवीन मार्ग

हाती आलेल्या माहितीनुसार, शिरूर-पाबळ-राजगुरुनगर-शिरवली-पाईट-वांद्रे-कर्जत असा हा नवीन मार्ग विकसित होणार आहे. या नवीन मार्गाची एकूण लांबी जवळपास 135 किलोमीटर राहणार आहे. या नवीन मार्गासाठी जवळपास 12000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

यामध्ये जमीन भूसंपादनाचा तसेच बांधकामाचा खर्च इंक्लुड करण्यात आला आहे. निश्चितच या नवीन मार्गामुळे मराठवाड्यातील वाहतुकीला मुंबईमध्ये जाण्यासाठी एक नवीन रोड उपलब्ध होणार असून यामुळे सध्या स्थितीत अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

हे पण वाचा :- मुंबई महापालिकेत नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी निघाली भरती, पगार मिळणार तब्बल एक लाख रुपये महिना

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe