Mumbai News : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी अर्थातच मुंबई शहरात स्वतःचे घर असावे असे स्वप्न कित्येकांनी उराशी बाळगल असेल. पण राजधानीत घर घेणे म्हणजेच फारच जिकीरीचे काम. कारण राजधानीतील घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. राजधानीतील घरांच्या आणि जमिनीच्या किमती सातत्याने वाढतच आहेत.
या शहरात जमिनीचा मोठा शॉर्टेज आहे. यामुळेच मुंबई शहराची घनता ही देशातील इतर शहरांपेक्षा अधिक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का मुंबई शहरांमधील 20% जमीन फक्त नऊ लोकांकडे आहे. या राजधानीच्या अन सर्वात महागड्या शहरातील जवळपास 20% जमीन फक्त नऊ जमीनदारांकडे असून आज आपण याच संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.

या 9 जमीनदारांकडे आहे मुंबईतील सर्वाधिक जमीन
स्वप्ननगरी, मायानगरी, बॉलीवुड नगरी अशा असंख्य नावाने चीरपरिचित राजधानी मुंबई येथे जमिनीची टंचाई असली, तरीही 2015 मध्ये स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी (SRA) च्या सर्वेक्षणात एक धक्कादायक माहिती समोर आली होती.
या संबंधित सर्वेक्षणाच्या अहवालात अशी माहिती समोर आली होती की, मुंबईच्या सुमारे 20% जमिनीवर केवळ 9 पारसी ट्रस्ट्स आणि कुटुंबांचा अधिकार आहे. या सर्वेक्षणातुन उपलब्ध झालेल्या माहितीनुसार राजधानीमधील एकूण 1 लाख एकर जमिनीपैकी सुमारे 34 हजार एकर जमीन राहण्यासाठी योग्य असून त्यातील जवळपास 6,800 एकर जमीन या 9 प्रमुख जमीनदारांकडे आहे.
त्यात गोदरेज कुटुंब 3,400 एकर जमिनीसोबत आघाडीवर आहे. ही जमीन विक्रोळी येथील ईस्टर्न एक्सप्रेस हायवे शेजारी आहे. पिरोजशा गोदरेज यांनी ही जमीन दुसऱ्या महायुद्धाच्या काळात केवळ 30 लाख रुपयांत विकत घेतली होती. तेव्हापासून ही जमीन गोदरेज कुटुंबाकडे आहे.
याशिवाय F.E. Dinshaw Trust यांच्याकडे राजधानीत 683 एकर इतकी जमीन असून ही जमीन मुंबईच्या मालाड परिसरात आहे. म्हणजे या यादीत हा ट्रस्ट दुसऱ्या क्रमांकावर आहे असं आपण म्हणू शकतो. तसेच, प्रतापसिंह वल्लभदास सुरजी कुटुंब हे या यादीत तिसऱ्या स्थानी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, यांच्याकडे तब्बल 647 एकर इतकी जमीन आहे. महत्वाची बाब म्हणजे ही जमीन भांडुप व आजूबाजूच्या परिसरात असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे. तसेच या यादीत जी. जी. आर्देशीर ट्रस्ट यांचे सुद्धा नाव आपल्याला पाहायला मिळते.
अहवालातुन प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या ट्रस्टच्या नावावर 508 एकर इतकी जमीन आहे. या ट्रस्टच्या नावावर असणारी शेकडो एकर जमीन चेंबूर भागात असल्याची नोंद करण्यात आली आहे. या यादीमध्ये वाडिया ट्रस्ट सुद्धा येतो. यांच्याकडेही राजधानीत मोठी जमीन आहे.
अहवालातून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या ट्रस्ट कडे कुर्लामध्ये शेकडो एकर जमीन आहे, सुमारे 361 एकर जमीन या ट्रस्टच्या नावे आहे. सर बायरामजी जी. जी.भॉय ट्रस्ट या ट्रस्टकडे सुद्धा मुंबईत बरीच जमीन आहे, या ट्रस्टकडे जवळपास 269 एकर इतकी जमीन आहे.
याशिवाय या यादीत सर मुहम्मद युसुफ खोत ट्रस्ट आणि वी. के. लाल कुटुंब सुद्धा समाविष्ट आहे. यांच्याकडे कांजुरमार्ग आणि कांदिवलीमध्ये जमीनी आहेत, अस या अहवालातुन समोर आले आहे.
इतकेच नाही तर राजधानी मुंबईच्या प्रमुख जमीन मालकांमध्ये मुंबई पोर्ट ट्रस्ट, मध्य आणि पश्चिम रेल्वे, राष्ट्रीय वस्त्र महामंडळ, महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारचे सुद्धा नाव समाविष्ट आहे. नक्कीच राजधानीत जमिनीला सोन्याचा भाव असतांना अवघ्या काही लोकांकडे अन संस्थाकडे मुंबईचा एक मोठा भुभाग आहे हे या अहवालातुन क्लिअर होते.