Mumbai Pune Electric Shivneri Bus : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून मुंबई आणि पुणेकरांना लवकरच एक मोठी भेट देण्यात येणार आहे.
मुंबई आणि पुणे ही महाराष्ट्रातील दोन महत्त्वाची शहरे असून या दोन शहरादरम्यान दररोज दैनंदिन कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे.
यामध्ये रस्ते मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. विशेषता या मार्गावर बसने प्रवास केला जातो. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाच्या माध्यमातून मुंबई ते पुणे मार्गावर सध्या स्थितीला 25 इलेक्ट्रिक शिवनेरी बस सुरू करण्यात आल्या आहेत.
या बसेसचा या मार्गावरील प्रवाशांना मोठा फायदा होत असून प्रवाशांनी या नवीन इलेक्ट्रिक शिवनेरी बसेसला चांगला प्रतिसाद दाखवला आहे. परिणामी आता एसटी महामंडळाच्या माध्यमातून या मार्गावर 100 इलेक्ट्रिक बस सुरू केल्या जाणार आहेत.
पुढल्या महिन्याच्या म्हणजेच जून महिन्याच्या अखेरपर्यंत या मार्गावर शंभर इलेक्ट्रिक शिवनेरी बस सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एका मीडिया रिपोर्टला दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्यापर्यंत 15 इलेक्ट्रिक शिवनेरी बस या मार्गावर सुरू केल्या जाणार आहेत.
तसेच जून अखेरपर्यंत 60 नवीन इलेक्ट्रिक शिवनेरी बस सुरू करण्याचा मानस महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा आहे. सध्या 25 इ शिवनेरी बस या मार्गांवर सुरू आहेत आणि आता 75 नवीन गाड्यां या मार्गावर सुरू होणार असल्याने याचा निश्चितच प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
सध्याच्या 25 इलेक्ट्रिक शिवनेरी बसचा रूट कोणता
सध्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून दादर ते पुणे या दरम्यान 10 आणि ठाणे आगार ते पुणे या दरम्यान 15 इलेक्ट्रिक शिवनेरी बस चालवल्या जात आहेत.
आम्ही आपणांस सांगू इच्छितो की, सध्या ठाणे आगार ते पुणेसाठी शिवनेरी एसी बसचं फुल तिकीट ५१५ रुपये इतकं आहे, तर हाफ तिकीट २७५ रुपये आहे.
विशेष म्हणजे या बसेसने महिलांसाठी हाफ तिकीटात प्रवास करता येतो. त्यामुळे या रूट वरील या गाड्यांना महिलांच्या माध्यमातून अधिक पसंती दाखवली जात आहे.
दरम्यान मुंबई-पुणे शिवनेरी बसचे तिकीट येत्या काही दिवसात 350 रुपये होणार असल्याची माहिती समोर आली आहे. निश्चितच तिकीट दरात जर कपात केली तर या मार्गावरील प्रवाशांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे.