Mumbai Pune Expressway Missing Link : मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या नेहमीच फार अधिक राहते. या मार्गावर दैनंदिन प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील फारच उल्लेख नाही आहे. मात्र रस्ते मार्गाने या दोन्ही शहरा दरम्यान जर प्रवास करायचा असेल तर सध्या फक्त आणि फक्त मुंबई पुणे एक्सप्रेस वे चा पर्याय प्रवाशांपुढे उभा आहे.
पण या मार्गावर दररोज हजारो वाहने ये-जा करतात आणि यामुळे येथे वाहतूक कोंडी होते. काही प्रसंगी या मार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांना अर्धा ते एक तास वाहतूक कोंडीतच अडकून राहावे लागते.

पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागातील जनता याच मार्गाने राजधानी मुंबई दाखवलं होत असते आणि यामुळे या महामार्गांवरील वाहनांची संख्या नेहमीच अधिक पाहायला मिळते. पण भविष्यात या महामार्गाचा प्रवास सुपरफास्ट होणार आहे. कारण की या महामार्गावर मिसिंग लिंक तयार केली जात आहे.
लोणावळ्याजवळ ही मिसिंग लिंक तयार होत असून या मिसिंग लिंकमुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आज आपण या मिसिंग लिंक प्रोजेक्टचा नेमका काय फायदा होणार याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मिसिंग लिंक प्रकल्पाचा नेमका फायदा काय?
मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा सहा पदरी प्रवेश नियंत्रित महामार्ग. हा महाराष्ट्रातील पहिला प्रवेश नियंत्रित महामार्ग असून याची लांबी 94 किलोमीटर इतकी आहे. दरम्यान या महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये धुमाकूळ घालतोय.
लोणावळा घाटात वाहनांची लांबच लांब रांग आणि त्यामुळे हजारो वाहने अडकून पडल्याचे व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे व्हिडिओ रात्रीचा आहे अर्थातच रात्री सुद्धा या महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी दिसते. दरम्यान हीच वाहतूक कोंडी निकाली निघावी यासाठी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून मिसिंग लिंक तयार केली जात आहे.
लोणावळा खंडाळा या ठिकाणी असणाऱ्या घाट सेक्शन मध्ये नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होते आणि या घाट सेक्शन मधून वाहनांना मोठा वळसा सुद्धा घालावा लागतो. या एक्सप्रेसवेवर खोपोली एक्झिट ते सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंतचे अंतर हे जवळपास 19 किलोमीटरचे आहे. मात्र आता हे अंतर 6 km ने कमी होण्याची शक्यता आहे.
कारण की मिसिंग लिंक प्रोजेक्ट अंतर्गत या मार्गावरील लोणावळा खंडाळा जवळील हा संपूर्ण घाट आणि चढ उतार टाळून थेट बाजूने दुसरा रस्ता तयार करण्यात येत आहे. या रस्त्यामध्ये दोन मोठे बोगदे आणि पूल यांचा समावेश आहे. दरम्यान या मिसिंग लिंकच्या बांधकामानंतर हे 19 किमीचं ते अंतर 13 किमी होईल.
यामुळे रस्त्याचे अंतर सहा किलोमीटरने कमी होणार आहे आणि प्रवाशांचा जवळपास अर्धा तास वाचणार आहे. या प्रकल्पाचे आत्तापर्यंत 92 टक्के इतके काम झाले असून हा प्रकल्प ऑगस्ट 2025 पर्यंत सर्वसामान्य प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती हाती येत आहे.