Mumbai Pune Expressway News : मुंबई ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. या दोन्ही शहरादरम्यान रेल्वे आणि रस्ते मार्गाने मोठ्या प्रमाणात प्रवास केला जातो. दरम्यान जर तुम्ही ही मुंबई ते पुणे दरम्यान रस्ते मार्गाने प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे.
मुंबई-पुणे महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि अगदीच कामाची अन महत्त्वाची बातमी समोर येत आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील एक एक्झिट मार्ग बंद करण्यात आला आहे.
![Mumbai Pune Expressway News](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Mumbai-Pune-Expressway-News.jpeg)
यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सदर बदलाची नोंद घेणे आवश्यक आहे. पनवेल येथील मुंबईकडे जाणारा एक्झिट मार्ग कळंबोली सर्कलमधील बांधकामामुळे ११ फेब्रुवारीपासून बंद केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. म्हणजेच उद्यापासून हा एक्झिट मार्ग बंद होणार आहे.
संबंधित कामासाठी हा एक्झिट मार्ग तब्बल पुढील सहा महिने बंद राहणार आहे. आता हा एक्झिट मार्ग बंद राहणार असल्याने या एक्झिट मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. आता आपण तुम्हाला यासाठीचे नेमके पर्यायी कोणते आहेत याची माहिती देणार आहोत.
मंडळी, कळंबोली जंक्शन सुधारणा प्रकल्प या अंतर्गत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) नवीन उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्याचे काम सुरू करत आहे, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हे काम उद्यापासून सुरू होणार आहे त्यामुळेचं उद्या 11 फेब्रुवारीपासून हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.
कसे राहणार पर्यायी मार्ग ?
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरून पनवेल, गोवा आणि जेएनपीटीकडे जाणारी वाहने कोनफाटा (९.६०० किमी) येथे पळस्पे सर्कल मार्गे राष्ट्रीय महामार्ग-४८ वर वळवण्यात आली आहेत.
पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या आणि तळोजा, कल्याण आणि शिळफाट्याकडे जाणाऱ्या वाहनांना १.२०० किमी अंतरावरून पनवेल-सायन महामार्गावर सरळ पुढे जावे लागेल आणि पुरुषार्थ पेट्रोल पंप उड्डाणपुलाखाली उजवीकडे वळून रोडपाली आणि राष्ट्रीय महामार्ग-४८ मार्गे पुढे जावे लागणार आहे.