Mumbai Pune News : मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई ते राज्याची सांस्कृतिक पुणे असा प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागतो.
रस्तेमार्गे हा फारच त्रासदायक बनत चालला आहे कारण की आता या प्रवासासाठी प्रवाशांना जवळपास दोन ते अडीच तासांचा वेळ लागतो. कधी कधी तर नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे चार तासांचा वेळ लागतो.

यामुळे अनेक जण मुंबई पुणे प्रवास रेल्वेने करण्याचा निर्णय घेतात. मात्र रेल्वेनेही अनेकदा तिकीट उपलब्ध होत नाही. दुसरीकडे, विमानाने प्रवास करायचं म्हटलं तर सर्वसामान्यांना त्याचे तिकीट दर परवडत नाहीत.
महत्वाची बाब म्हणजे अलीकडे पुणे मुंबई विमानसेवेचे तिकीट दर सुद्धा महागले आहे. दरम्यान याच सर्व पार्श्वभूमीवर आता मुंबई ते पुणे दरम्यान हेलिकॉप्टर ची सेवा सुरू झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सवर जर विश्वास ठेवायचे झाले तर या हेलिकॉप्टर सेवेमुळे आता मुंबई – पुणे हा प्रवास फक्त तीस मिनिटांमध्ये पूर्ण होत असून ही हेलिकॉप्टरची सेवा एका खाजगी कंपनीकडून सुरू करण्यात आली आहे.
मुंबईतील विमान कंपनी फ्लायो इंडियाने मुंबई पुणे दरम्यान हेलिकॉप्टर सेवा सुरू केली असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मधून समोर आला आहे. या हेलिकॉप्टर सेवेची विशेषता म्हणजे याचे तिकीट दर हे खिशाला परवडणारे आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये या हेलिकॉप्टर सेवेबाबत माहिती देण्यात आली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत हेलिकॉप्टर सेवेबाबत लोकांना माहिती दिली जात आहे.
या व्हिडीओत रस्त्यावरील वाहतूक टाळण्यासाठी ही नव्याने सुरू झालेली हेलिकॉप्टर सेवा खूपच फायदेशीर असल्याचाही दावा होताना दिसतोय. या मार्गांवर वापरले गेलेले हेलिकॉप्टर एअरबस एच125 आहे.
हे एकल-इंजिन असलेले हेलिकॉप्टर आहे. यात एक पायलट आणि सहा प्रवाशांची आसन क्षमता आहे. कंपनीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हेलिकॉप्टर राईड चा व्हिडिओ टाकला आहे.
मात्र कंपनीकडून मुंबई पुणे मार्गावर व्यावसायिक सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे की नाही यासंदर्भात अजून कोणतीच माहिती समोर आली नाही. तसेच मुंबई पुणे दरम्यान प्रवासासाठी या हेलिकॉप्टर सेवेचे तिकीट दर किती असणार याबाबतही अधिकृत माहिती सांगितली गेलेली नाही.
मात्र व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने या हेलिकॉप्टर सेवेसाठी 3500 तिकीट आकारले जात असल्याचा दावा केला आहे, तर एकाने थेट पंधरा हजार रुपये तिकीट दर असल्याचे म्हटले आहे.













