मुंबई, पुणेकरांना ‘या’ पालिकेच्या निर्णयामुळे बसतोय मोठा फटका ! डेक्कन क्वीनला ‘या’ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात थांबा नाही, प्रकरण काय? पहा….

Ajay Patil
Published:
Mumbai Pune Railway Deccan Queen

Mumbai Pune Railway Deccan Queen : राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरा दरम्यान रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. कामानिमित्त आजही हजारो कामगार, व्यावसायिक, विद्यार्थी तसेच पर्यटक रोज पुणे ते मुंबई हा प्रवास अपडाउनने करतात. या दोन शहरा दरम्यान बहुसंख्य जनसंख्या रेल्वे मार्गे प्रवास करते.

हेच कारण आहे की, मध्य रेल्वेने मुंबई सोलापूर ही वंदे भारत गाडी सुरू केली आहे. ही गाडी पुणे मार्गे जात असल्याने याचा सर्वाधिक फायदा हा पुणेवासीयांना होतोय. असे असले तरी मात्र या गाडीच्या वेळापत्रकामुळे मुंबई ते पुणे प्रवासासाठी अजूनही बहुतांशी प्रवासी डेक्कन क्वीनला पसंती दर्शवत आहेत.

हे पण वाचा :- पुणे रिंगरोडबाबत मोठी बातमी; मे महिन्यात होणार ‘हे’ महत्वाचं काम, पहा….

दरम्यान आज आपण डेक्कन क्वीनबाबत एक इंटरेस्टिंग किस्सा जाणून घेणार आहोत. वास्तविक, डेक्कन क्वीन मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवासासाठी अति महत्त्वाची आहे. ही गाडी प्रवाशांसाठी फायदेशीर ठरली असून यामुळे रेल्वे मार्गे मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा बहुमूल्य वेळ वाचत आहे.

परंतु कल्याण व आजूबाजूच्या परिसरात असलेल्या प्रवाशांना या गाडीने पुण्याकडील प्रवास करण्यासाठी ठाणे रेल्वे स्टेशन वरून ही गाडी पकडावी लागते. विशेष म्हणजे फार पूर्वी ही गाडी कल्याण रेल्वे स्टेशनवर थांबत होती मात्र आता कल्याण या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबत नाही. म्हणून मग याचं कारण नेमकं काय हेच आज आपण जाणून घेणार आहोत.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकऱ्याचा नवीन प्रयोग ! चक्क पिवळ्या कलिंगडची केली लागवड, कमवलेत लाखों; पहा ही यशोगाथा

मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी कल्याण पालिकेच्या माध्यमातून लांब पल्ल्याच्या गाड्यांकडून कर वसूल केला जात होता. डेक्कन क्वीन कडून देखील कल्याण पालिकेच्या माध्यमातून कर वसूल केला जात असे. मात्र, रेल्वेने कल्याण पालिकेचा हा कर काही काळ थकवला.

कल्याण पालिकेने मात्र कर न भरल्यामुळे डेक्कन क्वीनचे इंजिनच जमा करून घेतले. पुढे मग प्रकरण कोर्टात केले. कोर्टाने पालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि मग रेल्वेला पालिकेचा जो काही कर होता तो भरावा लागला तेव्हा पालिकेने डेक्कन क्वीनचे इंजिन परत केले. मात्र यानंतर कल्याण पालिका आणि रेल्वेमध्ये चांगलीच जुपंली. 

हे पण वाचा :- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय; पगारात होणार तब्बल 8000 ची वाढ

तेव्हापासून रेल्वेने पालिकेने आपला अपमान केला म्हणून या ठिकाणी डेक्कन क्वीन न थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे डेक्कन क्वीन कल्याण रेल्वे स्टेशनवर थांबवा यासाठी वारंवार प्रवाशांच्या माध्यमातून निवेदने रेल्वे कडे दिली जात आहेत. पण आपला अपमान केला म्हणून रेल्वे आजही कल्याणला डेक्कन क्वीन थांबवत नाही.

एकंदरीत या निर्णयामुळे पुणेकरांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. रेल्वे आणि कल्याण पालिकेच्या मध्यात मात्र सामान्य प्रवासी आजही भरडला जात आहे. तर दुसरे कारण असेही सांगितले जाते की डेक्कन क्वीन ही एक सुपरफास्ट ट्रेन असून या गाडीला अधिक थांबा दिला तर या गाडीला आपलं गणतव्यस्थळ गाठण्यासाठी उशीर होऊ शकतो.

हे पण वाचा :- 10वी पास तरुणांसाठी मोठी बातमी ! भारतीय सैन्यात ‘या’ पदासाठी सुरू झाली मोठी भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवायचा आहे अर्ज, पहा संपूर्ण माहिती…

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe