मुंबई, पुणेकरांसाठी गुड न्यूज ! मुंबईहून राज्यातील ‘या’ शहरासाठी सुरू होणाऱ्या एक्सप्रेस ट्रेनला पुण्यात थांबा मंजूर, वाचा सविस्तर

ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून धावणार असून या गाडीला पुण्याला थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे लातूर सहित संपूर्ण मराठवाडा, पुणे आणि मुंबई येथील रेल्वे प्रवाशांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळेल असा विश्वास जाणकारांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

Published on -

Mumbai Pune Railway News : येत्या काही दिवसांनी विजयादशमी अर्थातच दसऱ्याचा मोठा सण येणार आहे. यानंतर संपूर्ण देशात दिवाळीचा आनंददायी पर्व साजरा केला जाणार आहे. दरवर्षी दसरा आणि दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. यंदाही या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे.

दरम्यान याच संभाव्यतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे प्रशासनाने मुंबईहून मराठवाड्यातील लातूर शहरासाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा केली आहे.

मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते लातूर दरम्यान रेल्वे प्रशासन साप्ताहिक ट्रेन चालवणार असल्याची बातमी समोर आली आहे. ही गाडी 19 ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर या काळात चालवली जाणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे ही गाडी पुणे रेल्वे स्थानकावरून धावणार असून या गाडीला पुण्याला थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे लातूर सहित संपूर्ण मराठवाडा, पुणे आणि मुंबई येथील रेल्वे प्रवाशांना सणासुदीच्या काळात दिलासा मिळेल असा विश्वास जाणकारांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान आता आपण या विशेष साप्ताहिक ट्रेनचे वेळापत्रक नेमके कसे राहणार, ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार? या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसे राहणार साप्ताहिक विशेष गाडीचे वेळापत्रक ?

रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई-लातूर साप्ताहिक विशेष गाडी 19 ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर या काळात दर शनिवारी मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटांनी सीएसएमटी वरून रवाना होणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी पोहचणार आहे. या काळात या विशेष एक्सप्रेस ट्रेनच्या चार फेऱ्या होणार आहेत.

तसेच लातूर मुंबई साप्ताहिक विशेष गाडी लातूर येथून दुपारी साडेचार वाजता लातूर रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचणार आहे. ही गाडी देखील 19 ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार असून या गाडीच्या सुद्धा एकूण चार फेऱ्या होणार आहेत.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार

रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे ही साप्ताहिक विशेष गाडी या मार्गावरील दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, उरुळी, दौंड, भिगवण, जेऊर, केम, कुर्दुवाडी, बारसी टाउन, उस्मानाबाद आणि हरंगुळ या स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे मराठवाड्यासहित पुण्यातील नागरिकांना देखील या गाडीचा मोठा फायदा होणार अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe