Mumbai Pune Solapur Railway News : मुंबई पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते खोरधा रोड दरम्यान विशेष रेल्वेगाडी धावणार आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुंबई ते खोरधा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे. खरंतर आजपासून एप्रिल महिन्याला सुरुवात झाली आहे आणि आता उन्हाळी सुट्ट्या देखील सुरू होतील.

पण उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की या मार्गावर नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते आणि याचा अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर अन प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून ही साप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे.
दरम्यान आज आपण पुणे, सोलापूर जिल्ह्यासाठी महत्त्वाच्या या समर स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी खोरधा समर स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक 01049) ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 5 एप्रिलपासून सुरू केली जाणार आहे. ही ट्रेन 28 जूनपर्यंत चालवली जाणार आहे.
या काळात ही गाडी प्रत्येक शनिवारी सीएसएमटी येथून रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि खोरधा रोड येथे तिसऱ्या दिवशी रात्री बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचणार आहे. तसेच, खोरधा-सीएसएमटी समर स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक 01050) ही विशेष रेल्वे 7 एप्रिलपासून 30 जूनपर्यंत चालवली जाणार आहे.
या काळात हे गाडी दर सोमवारी दुपारी अडीच वाजता खोरधा रोड येथून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी ही गाडी मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.
रेल्वेच्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, विशेषतः प्रवासासाठी अतिरिक्त सोय उपलब्ध होणार आहे. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर या विशेष गाडीला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आता आपण ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार हे पाहूयात.
समर स्पेशल ट्रेन कोणकोणत्या स्थानकावर थांबणार
सेंट्रल रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, या विशेष गाडीला दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, वाडी, विकाराबाद, सिकंदराबाद, गुंटूर, विजयवाडा जंक्शन, राजमंड्री, सामलकोट जंक्शन, पिठापुरम, दुव्वाडा, कोत्तवलसा, विजयनगरम, श्रीकाकुलम रोड, पलासा, ब्रह्मपुर आणि बालुगाव या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे या स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.