Mumbai Railway : गणेशोत्सवानंतर आत्ता येत्या काही दिवसांनी नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. 22 सप्टेंबर पासून नवरात्र उत्सवाची सुरुवात होईल. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी विजयादशमीचा सण साजरा केला जाईल आणि त्यानंतर दिवाळी येणार आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर रेल्वे कडून आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवरात्र उत्सव आणि दिवाळीच्या काळात रेल्वे कडून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. दिवाळीनिमित्ताने मुंबईवरून देखील विशेष गाड्या चालवल्या जातील.

या दिवाळीत मुंबई लातूर स्पेशल ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे. नक्कीच दिवाळीच्या काळात प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.
ही गाडी 24 सप्टेंबर पासून चालवली जाणार आहे. रेल्वेने सांगितल्याप्रमाणे या गाडीची आठवड्यातून एक फेरी होणार आहे. 26 नोव्हेंबर पर्यंत रेल्वे कडून ही स्पेशल गाडी चालवली जाणार आहे.
महत्वाची बाब म्हणजे या गाडीला मुरुड रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलाय. खरे तर कोरोनाच्या आधी मुंबई-लातूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या नियमित गाडीला मुरुड रेल्वे स्थानकावर थांबा मिळत होता.
परंतु कोरोनाच्या काळात रेल्वेने मुरुड रेल्वे स्थानकावरील थांबा रद्द केला. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना नंतरही मुरुड रेल्वे स्थानकावरील थांबा पूर्ववत करण्यात आला नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी सुद्धा आहे.
पण आता दिवाळीच्या काळात चालवल्या जाणाऱ्या स्पेशल गाडीला मुरुड रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय झालाय. यामुळे मुंबई लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तात्पुरता दिलासा मिळणार आहे.
सहा वर्षांपूर्वी मुंबई लातूर नियमित रेल्वे गाडीचा मुरुड चा थांबा रद्द करण्यात आला होता. या रेल्वे स्थानकावर गाडी थांबावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता पण प्रशासनाकडून याबाबत निर्णय होत नव्हता.
मात्र आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर स्पेशल गाडी सुरू करण्याची घोषणा करण्यात आली असून ही गाडी मुरुड रेल्वे स्थानकावर थांबवली जाईल. दिवाळीत चालवली जाणारी गाडी मुंबईच्या LTT मधुन दर रविवारी रात्री बारा वाजून 55 मिनिटांनी सोडली जाणार आहे.
ही गाडी नवरात्र उत्सव आणि दिवाळीत सुरू राहणार आहे. पुढे नाताळनिमित्ताने या गाडीला मुदतवाढ मिळू शकते पण याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.