मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ भागात विकसित होणार नवीन रेल्वे स्थानक, मेट्रोचाही विस्तार होणार

देशाची आर्थिक राजधानी मुंबईसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईत एक नवीन स्थानक विकसित होणार आहे. शिवाय मुंबईमधील एका महत्त्वाच्या मेट्रो मार्गाचा विस्तार होणार आहे. 

Published on -

Mumbai Railway : देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी एक नव स्थानक विकसित होणार आहे.

खरे तर शासनाकडून धारावी पुनर्विकास योजना हाती घेण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, याच धारावी पुनर्विकास योजनेच्या (डीआरपी) अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या नव्या वसाहतीत नागरी सोयींसोबतच सार्वजनिक वाहतुकीला महत्त्व दिले जात आहे.

या अनुषंगाने धारावीपर्यंत मेट्रो धावणार आहे. धारावीत मेट्रो मार्गिका-11 चा विस्तार केला जाईल आणि धारावी सेंट्रल मेट्रो स्थानक उभारले जाणार आहे. महत्वाची बाब अशी की याचा प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत आता आपण या प्रकल्पाची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

कस असणार नवीन स्थानक? 

धारावी रीडेव्हलपमेंट प्रोजेक्ट अंतर्गत हे स्थानक तयार केले जाणार असून हे स्थानक तयार झाल्यानंतर ते मुंबईतील पहिले मेट्रो इंटरचेंज स्टेशनं राहणार आहे. संबंधितांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, धारावी सेंट्रल हे स्थानक केवळ मेट्रोसाठी नव्हे, तर रेल्वे, बससेवा, सायकल ट्रॅक आणि पादचारी मार्गांसाठी सुद्धा केंद्रबिंदू ठरणार आहे.

मेट्रो-11 सह इतर महत्त्वाच्या मार्गांच्या संगमावर हे स्थानक उभारले जाणार अशी माहिती समोर आली आहे आणि ते एक बहुविध परिवहन केंद्र म्हणून विकसित केले जाणार असाही दावा करण्यात आला आहे.

त्यामुळे धारावी हे एक वाहतूक बदल स्थानक म्हणून ओळखले जाईल. नवीन स्थानक बहुस्तरीय राहणार आहे. हे स्थानक पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशांना जोडणाऱ्या मार्गांना जोडलेले राहणार आहे.

याचा फायदा धारावीत वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांना तसेच कामानिमित्ताने येथे येणाऱ्या प्रवाशांना सुद्धा होणार आहे. या नव्या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी दूर होणार आहे आणि प्रदूषण देखील कमी होईल.

या प्रकल्पात चालणाऱ्यांसाठी सुसज्ज पायवाट, सायकल ट्रॅक, पूरक बससेवा अशा सुविधा पुरवल्या जातील. केवळ वाहनांवर आधारित न करता, पादचारी व पर्यायी वाहतुकीला प्राधान्य दिल्याने धारावीतील प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित होणार असा विश्वास या निमित्ताने जाणकारांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

नक्कीच या प्रकल्पामुळे धारावीच्या विकासाला एक नवीन दिशा आणि चालना मिळणार आहे. हा प्रकल्प एक गेम चेंजर प्रकल्प म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News