Mumbai Railway : मुंबई – पुणे – सोलापूर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मध्य रेल्वेकडून मोठी गुड न्यूज समोर आली आहे. खरे तर रेल्वे प्रशासनाकडून महाराष्ट्रात 11 वंदे भारत एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. राज्यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते शिर्डी,
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, नागपूर ते सिकंदराबाद, नागपूर ते इंदोर, नागपूर ते बिलासपुर, पुणे ते कोल्हापूर आणि पुणे ते हुबळी या मार्गांवर वंदे भारत ट्रेन सुरू आहे.

यातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या संदर्भात मध्य रेल्वे प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
काय आहे नवा निर्णय ?
मुंबई ते सोलापूर या मार्गावर धावणारी वंदे भारत ट्रेन 16 डब्यांची होती. मात्र या गाडीला प्रवाशांचा अद्भुत प्रतिसाद मिळतोय आणि यामुळे प्रवाशांकडून या गाडीच्या डब्यांची संख्या वाढली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली होती.
विविध प्रवासी संघटनांच्या माध्यमातून यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. दरम्यान रेल्वे प्रशासनाने या गाडीला मिळणारा अद्भुत प्रतिसाद पाहता रेल्वे बोर्डाकडे या संदर्भातील प्रस्ताव सादर केला. रेल्वे प्रशासनाकडून मुंबई – सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसच्या डब्ब्यांची संख्या वीस पर्यंत वाढवली गेली पाहिजे अशी मागणी केली.
दरम्यान, रेल्वे प्रशासनाच्या या प्रस्तावावर रेल्वे बोर्डाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून आजपासून अर्थातच 28 जुलै 2025 पासून मुंबई – पुणे सोलापूर या मार्गावर 20 डब्यांची वंदे भारत ट्रेन धावणार आहे.
त्यामुळे मुंबई ते पुणे आणि पुणे ते सोलापूर यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, पुणे, कुर्डूवाडी या पाच स्थानकांवर थांबते.
रेल्वे बोर्डाच्या निर्णयाचा फायदा काय होणार?
खरे तर, मुंबई – पुणे – सोलापूर यादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनला ही गाडी सुरू झाल्यापासूनच मोठा प्रतिसाद मिळतं आहे. मात्र, या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या नेहमीच अधिक असल्याने अनेकांना आरक्षण मिळत नसल्याची तक्रार कायम होती.
म्हणूनच या वंदे भारत ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली होती. याच मागणीनुसार आता रेल्वे बोर्डाने या वंदे भारत ट्रेनला चार अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आता मुंबईतून धावणाऱ्या या वंदे भारत ट्रेनला चार जादा डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने प्रवाशांची वहन क्षमता सुमारे 20 ते 30 टक्क्यांनी वाढणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांचा प्रवास सुलभ होणार अशी आशा आहे.