Mumbai Railway : मुंबई अन मुंबई उपगरात राहणाऱ्यांसाठी लोकल म्हणजे लाईफलाईन. दरम्यान राजधानी मुंबईतील या लाईफ लाईनचे नेटवर्क गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे मुंबईकरांना एक जागतिक दर्जाची कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली आहे.
दरम्यान नजीकच्या भविष्यात लोकलचा विस्तार थेट नाशिक पर्यंत होणार असे संकेत मिळू लागले आहेत. रेल्वे प्रशासनाने अलीकडेच एका महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे आणि यामुळे भविष्यात मुंबई ते नाशिक या दरम्यान लोकल धावू शकते अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

नाशिक सह उत्तर महाराष्ट्रातील जनता दररोज हजारोंच्या संख्येने मुंबईत दाखल होते. यामुळे नाशिक- मुंबई लोकल सेवा सुरू झाली पाहिजे अशी अनेक वर्षांपासून ची मागणी आहे.
परंतु रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून तांत्रिक अडचणींमुळे लोकल सेवा सुरू करता येणार नाही असे म्हटले जात आहे. पण आता मनमाड-कसारा आणि कसारा-मुंबई रेल्वे मार्गावर दोन नवीन रेल्वे लाईन टाकल्या जाणार आहेत.
सुमारे 131 किलोमीटरच्या या मार्गांवर दोन नवीन रेल्वे लाईन टाकण्याचा प्रस्तावाला नुकतीच मंजुरी मिळाली आहे. रेल्वे प्रशासनाच्या या औपचारिक मंजुरीमुळे आता नाशिक-कसारा लोकल सेवा सुरु होण्याच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
या प्रकल्पामुळे नाशिककरांची अनेक वर्षांपासूनची लोकलची मागणी पूर्ण होऊ शकते. सध्या नाशिकहून मुंबईसाठी ज्या रेल्वे गाड्या धावतात त्यातील बहुतांशी गाड्या दादरच्या आधीच्या रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत आणि याचा फटका प्रवाशांना बसतो.
यामुळे नाशिक ते कसारा लोकल सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. नाशिक-कसारा दरम्यान दोन नवीन रेल्वेलाईन टाकण्यास मंजुरी मिळाल्याने नाशिकहून कसारा आणि कसाऱ्याहून मुंबई किंवा थेट नाशिकहून मुंबई अशी लोकल सेवा सुरु होईल असे आशादायी चित्र आता तयार होतांना दिसत आहे.
या प्रकल्प अंतर्गत पाडळी, वैतरणानगर, चिंचलेखैरे अशी नवीन स्थानके विकसित करण्यात येतील अशी पण माहिती समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे नाशिक – मुंबई प्रवास वेगवान होणार आहे.
हे प्रकल्प फक्त नाशिक साठीच नाही तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी गेमचेंजर ठरू शकतात. या प्रकल्पासाठी खासदार राजाभाऊ वाजे यांनी सातत्याने केंद्राकडे पाठपुरावा केला आहे. त्यांच्याच पाठपुराव्याचे यश म्हणून रेल्वे प्रशासनाने या रेल्वे मार्गीकांना औपचारिक रित्या मान्यता दिली आहे.













