मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! 26 मे पासून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कुठून कुठपर्यंत धावणार ?

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. उद्यापासून मुंबईकरांच्या सेवेत एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार असून आज आपण याच नव्या एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेणार आहोत.

Published on -

Mumbai Railway : तुम्हीही रेल्वेने प्रवास करता का अहो मग आजची बातमी तुमच्याच कामाची आहे. ही बातमी देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई मधील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे.

उद्यापासून अर्थातच 26 मे 2025 पासून मुंबई वरून एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. या एक्सप्रेस ट्रेन ला नुकत्याच काय दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे.

राजस्थान येथील बिकानेर मधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिकानेर – मुंबई दरम्यानच्या नव्या एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला असून यामुळे राजस्थान आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.

या एक्सप्रेस ट्रेन चे उद्घाटन गुरुवारी झाले असेल तरीदेखील ही गाडी सर्वसामान्यांसाठी 26 मे 2025 पासून सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या नव्या एक्सप्रेस ट्रेनचा रोड मॅप आणि या गाडीचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा राहणार रूट?

गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई येथील वांद्रे टर्मिनस ते राजस्थान मधील बिकानेरदरम्यानचा नव्या एक्सप्रेस ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवला. या गाडीमुळे राजस्थान मधील प्रवाशांना जलद गतीने राजधानी मुंबईत पोहोचता येणार आहे.

मुंबईत राजस्थान येथील हजारो लोक कामानिमित्ताने स्थायिक झालेले आहेत यामुळे या लोकांसाठी ही नवी एक्सप्रेस ट्रेन फारच फायद्याची राहणार आहे. ही ट्रेन आठवड्यातून एक दिवस चालवली जाईल म्हणजेच साप्ताहिक राहणार आहे.

ही गाडी वांद्रे टर्मिनस येथून 26 मे 2025 पासून सुरू होणार आहे आणि बिकानेर येथून 28 मे पासून सुरू होणार आहे. आता आपण या गाडीचे वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याचा आढावा घेणार आहोत. 

कसं राहणार वेळापत्रक ?

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे टर्मिनस – बिकानेर एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक 21903 ) दर सोमवारी वांद्रे टर्मिनस येथून सोडली जाणार आहे.

वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावरून ही गाडी 23.25 वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी 20.40 वाजता राजस्थान मधील बिकानेर रेल्वे स्टेशन वर पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ट्रेन क्र. 21904 ही ट्रेन दर बुधवारी बिकानेर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

या दिवशी ही गाडी बिकानेर रेल्वे स्थानकावरून सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजून 45 मिनिटांनी ही गाडी मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे पोहोचणार आहे. या गाडीची सुरुवात 28 मे 2025 पासून होणार आहे.

कोण – कोणत्या स्थानकावर थांबणार नवीन एक्सप्रेस?

ट्रेन क्रमांक 21903 आणि ट्रेन क्र. 21904 ही गाडी बोरीवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, नडियाद, साबरमती, महेसाणा, पालनपूर, अबू रोड, फलना, मारवाड, पाली मारवाड, जोधपूर, मेर्टा रोड, नागौर, नोखा आणि देशनोक या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe