मुंबईहून चेन्नई आणि कन्याकुमारीसाठी नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार ! कसं असणार टाईमटेबल ?

येत्या काही दिवसांनी उन्हाळी सुट्ट्या सुरू होतील आणि यानंतर अनेक जण आपल्या मूळ गावाला परतणार आहेत. म्हणून, दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. अनेकांना तिकीट मिळत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता रेल्वे कडून मुंबईवरून चेन्नई आणि कन्याकुमारी साठी नवीन विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Published on -

Mumbai Railway : येत्या चार दिवसात मार्च महिन्याचा सेंड ऑफ होणार आहे. दरम्यान मार्च महिन्याच्या शेवटीच मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक कामाची बातमी समोर आली आहे. खरे तर येत्या काही दिवसांनी उन्हाळी सुट्ट्या सुरू होतील आणि यानंतर अनेक जण आपल्या मूळ गावाला परतणार आहेत.

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागतात आणि यामुळे काही जन पिकनिकचा सुद्धा प्लॅन बनवतात. म्हणून, दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये विविध रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. अनेकांना तिकीट मिळत नाही.

यामुळे त्यांना दुसऱ्या पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता रेल्वे कडून मुंबईवरून चेन्नई आणि कन्याकुमारी साठी नवीन विशेष रेल्वे गाडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आज आपण मुंबई ते चेन्नई आणि मुंबई ते कन्याकुमारी दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक नेमके कसे राहणार ? याचाच एक थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

मुंबई-चेन्नई साप्ताहिक विशेष ट्रेनचे वेळापत्रक कसं असणार ?

सेंट्रल रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार मुंबई ते चेन्नई दरम्यान आणि मुंबई ते कन्याकुमारी दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन सोलापूर मार्गे धावणार आहे.

मुुंबई-चेन्नई साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन 09, 16, 23, 30 एप्रिल रोजी मुंबईहून रात्री 12.20 वाजता सुटेल आणि सोलापूर स्थानकावर सकाळी 7.30 वाजता येईल. इथं पाच मिनिटांचा थांबा घेऊन 7.35 वाजता ही गाडी चेन्नईकडे रवाना होईल. चेन्नईला ती रात्री 11.30 वाजता पोहोचणार आहे.

चेन्नई-मुंबई साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस 10, 17, 24 एप्रिल आणि 01 मे रोजी पहाटे चार वाजता चेन्नईहून निघेल. सोलापूरला रात्री 8.10 वाजता येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन, 8.15 वाजता मुंबईकडे रवाना होईल, तर मुंबईला शुक्रवारी पहाटे 4.15 वाजता पोहोचणार आहे.

मुंबई कन्याकुमारी विशेष ट्रेनचे वेळापत्रक कस असणार?

मुंबई-कन्याकुमारी (गाडी क्रमांक 01005) ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 9 एप्रिल ते 25 जून दरम्यान चालवली जाणार असून या काळात या गाडीच्या 12 फेर्‍या होतील. या काळात गाडी क्रमांक 01005 ही विशेष एक्सप्रेस ट्रेन मुंबईहून बुधवारी रात्री 12.30 वाजता निघेल.

सोलापूरला सकाळी 8.30 वाजता येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन 8.35 वाजता रवाना होईल. कन्याकुमारीला गुरुवारी दुपारी 1.45 वाजता पोहोचेल. तसेच गाडी क्रमांक 01006 कन्याकुमारी-मुंबई एक्स्प्रेस 10 एप्रिल ते 26 जूनदरम्यान चालवले जाणार असून या काळात या गाडीच्या एकूण 12 फेर्‍या होतील.

ही ट्रेन कन्याकुमारीहून दुपारी 4.45 वाजता निघेल. सोलापूरला शुक्रवारी रात्री 8.10 वाजता येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन 8.15 वाजता रवाना होईल. मुंबईला शनिवारी पहाटे 4.15 वाजता पोहोचणार आहे. यामुळे मुंबई ते कन्याकुमारी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe