Mumbai Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी विशेषता मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून मुंबईकरांसाठी नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरे तर, मुंबई शहर आणि उपनगरातील शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी आणि सरकारी कर्मचाऱ्यांना 6 डिसेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून काल 19 / 11 / 2025 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. दरम्यान आता मुंबईकरांसाठी रेल्वे विभागाने देखील एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणारी अतिरिक्त गर्दी पाहता मुंबई आणि नागपूर दरम्यान रेल्वे कडून एक नवीन स्पेशल गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पेशल गाडी सीएसएमटी ते नागपूर दरम्यान सुरू करण्यात येणार असून आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नागपूर–मुंबई मार्गावर वाढलेल्या प्रवासी गर्दीचा विचार करून मध्य रेल्वेकडून अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ४ ते ८ डिसेंबर दरम्यान नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), तसेच मुंबई ते नागपूर या मार्गांवर एकेरी व दुहेरी विशेष गाड्या धावणार आहेत.
नागपूर ते मुंबई विशेष गाड्या
गाडी क्रमांक 01260
नागपूर प्रस्थान – 4 डिसेंबर, 18:15 वाजता
मुंबई सीएसएमटी आगमन – पुढील दिवशी 10:55 वाजता
गाडी क्रमांक 01262
नागपूर प्रस्थान – 4 डिसेंबर, 23:55 वाजता
मुंबई सीएसएमटी आगमन – पुढील दिवशी 15:05 वाजता
गाडी क्रमांक 01264
नागपूर प्रस्थान – 5 डिसेंबर, 08:00 वाजता
मुंबई सीएसएमटी आगमन – त्याच दिवशी 23:45 वाजता
गाडी क्रमांक 01266
नागपूर प्रस्थान – 5 डिसेंबर, 18:15 वाजता
मुंबई सीएसएमटी आगमन – पुढील दिवशी 10:55 वाजता
कुठं थांबणार ट्रेन
01260, 01262, 01264 आणि 01266 या स्पेशल गाड्या अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण, दादर या स्थानकावर थांबा घेणार आहेत.
मुंबई ते नागपूर एकेरी विशेष गाड्या
गाडी क्रमांक 01249
मुंबई प्रस्थान – 6 डिसेंबर, 20:50 वाजता
नागपूर आगमन – पुढील दिवशी 11:20 वाजता
गाडी क्रमांक 01253
दादर प्रस्थान – 7 डिसेंबर, 00:40 वाजता
नागपूर आगमन – त्याच दिवशी 16:10 वाजता
गाडी क्रमांक 01251
मुंबई प्रस्थान – 7 डिसेंबर, 10:30 वाजता
नागपूर आगमन – पुढील दिवशी 00:55 वाजता
गाडी क्रमांक 01255
मुंबई प्रस्थान – 7 डिसेंबर, 12:35 वाजता
नागपूर आगमन – पुढील दिवशी 03:00 वाजता
गाडी क्रमांक 01257
मुंबई प्रस्थान – 8 डिसेंबर, 00:20 वाजता
नागपूर आगमन – त्याच दिवशी 16:10 वाजता
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार एकेरी विशेष गाडी
रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई ते नागपूर दरम्यान धावणारी एकेरी विशेष गाडी या मार्गावरील दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे.
रेल्वे प्रशासनाने सांगितले की, या विशेष गाड्यांमुळे नागपूर–मुंबई प्रवास सोयीचा होणार असून आंबेडकरी अनुयायांसाठी या गाड्या विशेष फायद्याच्या ठरणार आहेत. दरम्यान तुम्हाला देखील या रेल्वेने प्रवास करायचा असेल तर तिकीट आरक्षण सर्व संगणकीकृत केंद्रांवर व IRCTC च्या वेबसाईटवर सुरू आहे.













