मुंबईहून ‘या’ शहरापर्यंत तयार केला जाणार नवा Railway मार्ग ! 15 स्थानके विकसित होणार, कसा असणार रूट ?

ठाणे भिवंडी कल्याण दरम्यान विकसित होणारा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. दरम्यान आता आपण याच मेट्रोमार्गाबाबत एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या प्रकल्पाचे किती काम पूर्ण झाले आहे, हा मेट्रो मार्ग प्रकल्प नेमका कसा राहील या मेट्रो मार्गावर किती स्थानके विकसित होणार यासंदर्भात आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Published on -

Mumbai Railway News : मुंबई शहरात आणि उपनगरात होणाऱ्या वाहतूक कोंडी मधून मुंबईकरांना दिलासा मिळावा या अनुषंगाने शहरातील रेल्वेचे जाळे मजबूत केले जात आहे. मुंबईकरांना मेट्रोची देखील भेट मिळाली आहे. दरम्यान आता मुंबई मेट्रोबाबतच एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. ठाणे भिवंडी कल्याण दरम्यान विकसित होणारा मेट्रो मार्ग लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.

दरम्यान या मेट्रो मार्ग प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर ठाणे भिवंडी कल्याण दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे. मेट्रो मार्ग 5 म्हणजेच ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग पूर्ण झाल्यानंतर लोकल वरील गर्दी देखील कमी होईल अशी आशा आहे.

दरम्यान आता आपण याच मेट्रोमार्गाबाबत एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. या प्रकल्पाचे किती काम पूर्ण झाले आहे, हा मेट्रो मार्ग प्रकल्प नेमका कसा राहील या मेट्रो मार्गावर किती स्थानके विकसित होणार यासंदर्भात आता आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.

कसा असणार मेट्रो मार्ग प्रकल्प

ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्ग हा 24.90 किलोमीटर लांबीचा म्हणजे जवळपास 25 किलोमीटर लांबीचा प्रोजेक्ट आहे. या मेट्रो मार्गावर एकूण 15 स्थानके विकसित होणार आहेत. या प्रकल्पाचा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी दरम्यान कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देणार असून यामुळे भिवंडीतून ठाणे किंवा मुंबईकडे जाणे सोयीचे होणार आहे.

खरे तर हा प्रोजेक्ट ठाणे भिवंडी व कल्याण परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे. या परिसरातील नागरिकांना या प्रकल्पामुळे जलद गतीने प्रवास करता येणे शक्य होईल.

कारण, सध्या सुरू असलेल्या मेट्रो मार्ग -4 (वडाळा ते कासारवडवली) या ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गाला जोडला जाणार आहे. याशिवाय प्रस्तावित मेट्रो मार्ग- 12 (कल्याण ते तळोजा) सुद्धा ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो मार्गाला जोडला जाणार आहे.

हा मेट्रो मार्ग मध्य रेल्वेला सुद्धा सोडला जाईल. खरे तर या प्रकल्पाचे काम 2019 मध्ये सुरू झाले होते आणि 2022 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार होता. या प्रकल्पासाठी 2022 ही डेडलाईन ठरवण्यात आली होती.

मात्र नियोजित वेळेत प्रकल्पाचे काम पूर्ण झाले नसल्याने प्रकल्पाची डेडलाईन पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. 31 मार्च 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल अशी आशा आहे. म्हणजेच या महिन्याअखेरीस हा मार्ग पूर्ण होईल आणि त्यानंतर यावर वाहतूक सेवा सुरू होणार आहे.

मेट्रो मार्गावरील 15 स्थानके

ठाणे भिवंडी कल्याण या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गावर 1. बाळकुम नाका, 2. कशेली, 3. काल्हेर, 4. पूर्णा, 5.अंजुरफाटा, 6. धामणकर नाका, 7. भिवंडी, 8. गोपाळ नगर, 9. टेमघर, 10. रजनोली, 11. गोव गाव, 12 कोन गाव, 13. लाल चौकी, 14. कल्याण स्टेशन, 15. कल्याण एपीएमसी ही स्थानके विकसित केली जात आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe