4 तासांचा प्रवास फक्त 120 मिनिटात ; मुंबईहुन ‘या’ शहरासाठी तयार होणार नवा रेल्वे मार्ग ! 2030 मध्ये पूर्ण होणार काम, कसा असणार रूट ?

ज्या प्रवासासाठी चार तासांचा वेळ लागतो तो प्रवास आता फक्त 120 मिनिटांमध्ये म्हणजे दोन तासात पूर्ण होणार आहे. देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबईला एक नवा रेल्वे मार्ग मिळणार आहे.

Published on -

Mumbai Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये देशातील विविध शहरांदरम्यान नवनवीन रेल्वे मार्ग विकसित करण्यात आले आहे. केंद्रातून सरकारकडून नुकतेच अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान नवा रेल्वे मार्ग तयार करण्याची घोषणा करण्यात आली असून या रेल्वे मार्ग प्रकल्पाच्या सर्वेक्षणास नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

या रेल्वे मार्गाचे एकूण तीन सर्व करण्यात आले होते यापैकी एका सर्वेला मान्यता मिळाली आहे. दुसरीकडे आता मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईहून दुबईपर्यंत एक नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे.

खरे तर गेल्या अनेक दिवसांपासून या प्रकल्पाच्या चर्चा सुरू आहेत. हा एक आंतरराष्ट्रीय प्रकल्प राहणार आहे. भारत आणि युएई या उभय देशांच्या माध्यमातून या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार असून यामुळे मुंबई ते दुबई हा प्रवास वेगवान होणार आहे. मंडळी सध्या मुंबई ते दुबई असा प्रवास करायचा असेल तर हवाई मार्गाने जावे लागते.

मुंबई ते दुबई असा प्रवास करण्यासाठी फक्त विमान प्रवासाचा एक मात्र पर्याय प्रवाशांकडे उपलब्ध आहे. मात्र आगामी काळात मुंबई ते दुबई प्रवासासाठी एक नवा वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई ते दुबई दरम्यान थेट रेल्वे मार्ग विकसित करण्याची योजना तयार केली जात आहे.

महत्त्वाचे म्हणजे हा संपूर्ण रेल्वे मार्ग समुद्राच्या पाण्याखालून तयार केला जाणार आहे. हा रेल्वे मार्ग प्रकल्प जवळपास 2000 km लांबीचा राहणार असून हा संपूर्ण मार्ग समुद्राच्या पाण्याखालून जाणार असल्याने हा जगातील सर्वाधिक लांबीचा समुद्राखालून जाणारा रेल्वे मार्ग बनणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे हा रेल्वे मार्ग तयार झाल्यानंतर यावर 600 ते 1000 किलोमीटर प्रति तास या वेगाने रेल्वे धावू शकते असा सुद्धा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जातोय. नक्कीच असे झाले तर रेल्वेच्या क्षेत्रात एक नवी क्रांती येणार आहे. हा प्रकल्प खरंच सत्यात उतरला तर याला चमत्कारच म्हणावे लागेल.

कारण यामुळे मुंबई ते दुबई हा प्रवास फक्त आणि फक्त 120 मिनिटांमध्ये होणार आहे. सध्या मुंबई ते दुबई हा प्रवास विमानाने करावा लागतो आणि या प्रवासासाठी विमान प्रवाशांना तब्बल चार तासांचा वेळ खर्च करावा लागत आहे.

पण जेव्हा हा समुद्राखालून जाणारा रेल्वे मार्ग विकसित होईल तेव्हा 2000 km चे हे अंतर फक्त आणि फक्त दोन तासात म्हणजेच 120 मिनिटांमध्ये पूर्ण करता येणे शक्य होणार असून यामुळे मुंबई ते दुबई दरम्यान चा प्रवास वेगवान होणार असून या उभय देशांच्या विकासासाठी हा प्रकल्प गेमचेंजर ठरणार आहे.

दरम्यान हा रेल्वे मार्ग प्रकल्प 2030 मध्ये पूर्ण होऊ शकतो असा सुद्धा एक अंदाज मीडिया रिपोर्ट मधून समोर आला आहे परंतु याबाबतची अधिकृत माहिती अजून पर्यंत तरी हाती आलेली नाही. या प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर हा प्रकल्प सध्या प्राथमिक अवस्थेत आहे.

जाणकारांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, हा प्रकल्प यूएईच्या नॅशनल ॲडव्हायझर ब्युरो लिमिटेडकडून प्रस्तावित करण्यात आला आहे. हा समुद्राखालून जाणारा रेल्वे मार्ग प्रकल्प विमान प्रवासासाठी एक नवा, वेगवान, आरामदायी तसेच सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देणार आहे.

महत्वाचे म्हणजे या रेल्वे प्रकल्पासाठी अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करावी लागणार आहे. मात्र या प्रकल्पावर सध्या तरी फक्त चर्चा सुरू आहे. याला अजून मंजुरी मिळालेली नाही. यामुळे खरंच मुंबई ते दुबई दरम्यान रेल्वे मार्ग तयार होणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News