Mumbai Railway News : मुंबईमधील नागरिकांसाठी एक मोठी आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की जवळपास साडेतीन दशकानंतर मुंबईमध्ये नवे रेल्वे टर्मिनस विकसित होणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की राजधानी मुंबईमध्ये 34 वर्षानंतर पहिल्यांदाच नवे रेल्वे टर्मिनस विकसित होणार असून या नव्या स्थानकामुळे मुंबईकरांचा रेल्वे प्रवास आणखी सोयीचा होणार आहे. दरम्यान आज आपण हे नवे रेल्वे टर्मिनस नेमके कुठे होणार याचा फायदा काय होणार याच साऱ्या मुद्द्यांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कुठे तयार होणार नव रेल्वे टर्मिनस
मिळालेल्या माहितीनुसार साडेतीन दशकानंतर राजधानी मुंबईला नव रेल्वे टर्मिनस मिळणार असून हे नवीन टर्मिनस मेट्रो लाईन 6 चा एक महत्त्वाचा भाग राहणार आहे.
हे नवीन रेल्वे टर्मिनस जोगेश्वरी येथे प्रस्तावित करण्यात आले असून यामुळे या भागातील वाहतूक कोंडी फुटणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वे थेट नवीन मेट्रो कॉरिडॉरशी जोडली जाणार आहे.
यामुळे पूर्व-पश्चिम दिशांतील प्रवास अधिक सुलभ होईल असा विश्वास देखील जाणकारांकडून व्यक्त होतोय. जे लोक मुंबईमध्ये वास्तव्याला आहेत त्यांना मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये किती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते हे माहिती असेलच.
दरम्यान पश्चिम उपनगरांमध्ये फक्त रस्त्यांवरच वाहतूक कोंडी होते असे नाही तर रेल्वेत सुद्धा अतिरिक्त गर्दी पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर जर जोगेश्वरी या ठिकाणी नवीन रेल्वे टर्मिनस विकसित झाले तर याचा नागरिकांना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
या नव्या टर्मिनसच्या माध्यमातून या भागातील स्थानिक प्रवाशांना पर्यायी सुविधा मिळणार आहे. तसेच गर्दीच्या वेळेत यामुळे प्रवास अधिक सुलभ होणार अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई शहरातील रेल्वेच्या वाहतूक रचनेत बदल घडवून आणण्याची क्षमता असणारे हे नवे रेल्वे टर्मिनस जोगेश्वरी येथे विकसित केले जात असून याचे काम 2025 पर्यंत पूर्ण होणार असल्याचा दावा संबंधितांच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
सध्या रेल्वे प्रशासन आणि संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून या प्रकल्पावर अगदीच गतीने काम सुरू आहे. यामुळे हा प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता जाणकारांकडून वर्तवली जात आहे.