Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबई ते गुजरात दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की मुंबई ते गुजरात दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक नवीन सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खरंतर, मुंबई ते अहमदाबाद दरम्यान भविष्यात बुलेट ट्रेन चालवली जाणार आहे. सध्या देशातील या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम अगदीच युद्ध पातळीवर सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे येत्या दोन वर्षांनी अर्थातच 2027 मध्ये या मार्गावर आपल्याला प्रत्यक्षात बुलेट ट्रेन धावताना सुद्धा दिसणार आहे.

येत्या दोन वर्षांनी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा पहिला टप्पा सुद्धा वाहतुकीसाठी खुला होऊ शकतो असा अंदाज आहे. दरम्यान बुलेट ट्रेन सुरू होण्याआधीच मुंबई ते गुजरात हा प्रवास वेगवान होणार आहे कारण की मुंबई ते गुजरात मधील राजकोट यादरम्यान नवीन सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते राजकोट दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला असून आज आपण याच समर स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक, तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेऊ शकते? यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस असणार वेळापत्रक?
पश्चिम रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 09005/09006 मुंबई सेंट्रल-राजकोट सुपरफास्ट स्पेशल ट्रेनच्या एकूण 34 फेऱ्या होणार आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की मुंबई सेंट्रल ते राजकोट समर स्पेशल ट्रेन म्हणजेच ट्रेन क्रमांक 09005 ही विशेष ट्रेन 21 एप्रिल पासून चालवली जाणार आहे.
ही गाडी 28 मे पर्यंत चालवली जाणार असून 21 एप्रिल ते 28 मे या कालावधीत ही गाडी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबई सेंट्रल स्थानकावरून रवाना होणार आहे. या दिवशी ही गाडी मुंबई सेंट्रल येथून रात्री 11.20 वाजता सुटणार आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता राजकोटला पोहोचणार आहे. या रेल्वेगाडीच्या या काळात एकूण 17 फेऱ्या होतील.
त्याचप्रमाणे ट्रेन क्रमांक 09006 22 एप्रिल पासून चालवली जाणार असून ही गाडी 29 मे पर्यंत धावणार आहे. या काळात ही गाडी दर मंगळवारी गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजता राजकोट रेल्वे स्थानकावरून निघणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसात वाजता ही गाडी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.
या रेल्वे गाडीच्या या काळात एकूण 17 फेऱ्या होणार आहेत. म्हणजेच मुंबई ते राजकोट अशा सतरा आणि राजकोट ते मुंबई अशा 17 अशा तऱ्हेने एकूण 34 फेऱ्या या विशेष गाडीच्या प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत.
समर स्पेशल ट्रेन कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार
पश्चिम रेल्वेचे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई सेंट्रल ते राजकोट दरम्यान चालवली जाणारी तेजस ही समर स्पेशल ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, आणंद, अहमदाबाद, विरमगाव, सुरेंद्रनगर आणि वांकानेर या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे.
यामुळे मुंबईहून गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल. तसेच गुजरातहुन मुंबईला येणाऱ्या नागरिकांसाठी देखील ही गाडी मोठी फायद्याची राहणार आहे.