9 एप्रिल 2025 पासून मुंबई शहरातून सुरू होणार नवीन रेल्वे गाडी ! ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणेसह ‘या’ शहरांमधील रेल्वे प्रवाशांना मिळणार दिलासा

राजधानी मुंबईहून मराठवाड्यातील एका प्रमुख शहरासाठी विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबई ते नांदेड दरम्यान विशेष गाडी चालवण्याची मोठी घोषणा रेल्वे कडून करण्यात आली आहे.

Updated on -

Mumbai Railway News : पुढील महिन्यात राज्यात आणि मुंबईवरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते आणि याच अतिरिक्त गरजेच्या अनुषंगाने रेल्वेच्या माध्यमातून मुंबई ते नांदेड दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

9 एप्रिल 2025 पासून या विशेष रेल्वे गाडीची सेवा सुरू होणार असून आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेऊ शकते याबाबत आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असणार मुंबई नांदेड विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक?

मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान उन्हाळी विशेष गाडी चालवली जाणार आहे.

या समर स्पेशल ट्रेनच्या 9 एप्रिल ते 25 जून या काळात एकूण 24 फेऱ्या होणार आहेत. मुंबई नांदेड विशेष एक्सप्रेस ट्रेन (ट्रेन क्रमांक 01105) ही एक साप्ताहिक ट्रेन असेल. ही गाडी 9 एप्रिल ते 25 जून या काळात चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी प्रत्येक बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 00.55 वाजता सुटेल आणि नांदेड येथे त्याच दिवशी 19.00 वाजता पोहोचणार आहे.

या गाडीच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर नांदेड मुंबई स्पेशल ट्रेन (ट्रेन क्रमांक 01106) 9 एप्रिल ते 25 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी प्रत्येक बुधवारी नांदेड येथून 20.00 वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी मुंबई येथे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 14.45 वाजता पोहोचणार आहे.

या ट्रेनमुळे मुंबई ते मराठवाड्यातील नांदेड आणि नांदेड ते मुंबई असा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. आता आपण या गाडीचा स्टॉपेज बाबत माहिती पाहूयात.

विशेष गाडी कुठे कुठे थांबणार

मुंबई ते नांदेड दरम्यान सुरू करण्यात येणारे विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. ही गाडी या मार्गावरील बारा महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे.

ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबणार असून यामुळे मुंबई पुणे सहित अनेक शहरांमधील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe