8 जुलै 2025 पासून मुंबई रेल्वे स्थानकावरून सुरू होणार नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन ! ‘ह्या’ रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर

तुम्हीही रेल्वेने प्रवास करता का ? मग तुमच्यासाठी आजची बातमी विशेष कामाची राहणार आहे. ही बातमी मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे कारण की मुंबईकरांसाठी पश्चिम रेल्वे कडून नवीन विशेष गाडी चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Published on -

Mumbai Railway News : उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर आता अनेक जण पुन्हा एकदा कामावर परतत आहेत. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अजूनही काही कमी झालेली नाही. जेवढी संख्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्यांची होती तेवढीच संख्या आता आपल्या गावातून परतणाऱ्यांची देखील आहे.

हेच कारण आहे की रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. दरम्यान आता पुढील महिन्यात पश्चिम रेल्वे कडून एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. मुंबई येथील वांद्रे टर्मिनस ते सुभेदारगंज या रेल्वे स्थानकादरम्यान ही नवीन विशेष गाडी चालवली जाणार आहे.

आठ जुलै 2025 पासून पश्चिम रेल्वे मुंबई वरून एक विशेष गाडी सुरू करणार आहे आणि आज आपण याच गाडीचे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार? याची डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

कसं असणार विशेष गाडीचे वेळापत्रक?

वांद्रे टर्मिनस-सुभेदारगंज सुपरफास्ट स्पेशल (गाडी क्रमांक 04126) आठ जुलै ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधी चालवली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या कालावधीत ही विशेष गाडी दर मंगळवारी वांद्रे टर्मिनसहून सव्वा अकरा वाजता सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी सुभेदारगंज रेल्वे स्थानकावर पाच वाजता पोहोचणार आहे.

तसेच, परतीच्या प्रवासात सुभेदारगंज-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल (गाडी क्रमांक 04125) सात जुलै ते 29 सप्टेंबर 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी दर सोमवारी सुभेदारगंज रेल्वे स्थानकावरून पाच वाजून वीस मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी ही गाडी सकाळी साडेनऊ वाजता मुंबई येथील वांद्रे टर्मिनस रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. 

विशेष गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार?

पश्चिम रेल्वे कडून चालवल्या जाणाऱ्या या विशेष गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही वांद्रे टर्मिनस ते सुभेदार गंज दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस गाडी या मार्गावरील बोरीवली, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, गंगापूर सिटी,

बयाना, रुपबास, फतेहपूर सिक्री, ईदगाह, तुंडला, इटावा, गोविंदपुरी आणि फतेहपूर या महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe