Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून चालवल्या जाणाऱ्या एका एक्सप्रेस ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेने सीएसएमटी ते धुळे दरम्यान चालवल्या जाणाऱ्या एक्सप्रेस ट्रेन च्या वेळापत्रकात बदल केला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की धुळ्यासहित संपूर्ण खानदेशातील नागरिकांकडून धुळे ते मुंबई दरम्यान एक नवीन गाडी सुरू करण्यात आली पाहिजे अशी मागणी केली जात होती. दरम्यान याच मागणीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने सीएसएमटी ते धुळे दरम्यान एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू केली. ही एक त्रीसाप्ताहिक म्हणजेच आठवड्यातून तीन दिवस धावणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन होती.

दरम्यान या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला धुळे ते मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी जबरदस्त प्रतिसाद दाखवला आणि हेच कारण आहे की ठराविक कालावधीसाठी सुरू करण्यात आलेली ही गाडी नियमित करण्यात आली. आता ही गाडी जवळपास दोन वर्षांपासून प्रवाशांच्या सेवेत आहे आणि दोन वर्षांनी आता प्रथमच या गाडीच्या वेळापत्रकात बदल होतोय.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून या गाडीचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे आणि या सुधारित वेळापत्रकानुसार आता ही गाडी धुळ्यात अर्धा तास आधीच पोहोचणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण सीएसएमटी – धुळे एक्सप्रेस ट्रेनचे सुधारित वेळापत्रक कसे आहे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.
कसे आहे सुधारित वेळापत्रक?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, आधी सीएसएमटी धुळे एक्सप्रेस ट्रेन सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून दुपारी बारा वाजता सोडली जात असे आणि ही गाडी त्याच दिवशी रात्री 20.55 वाजता धुळे रेल्वे स्थानकावर पोहोचत असे.
परतीच्या प्रवासात ही गाडी धुळे येथून सकाळी साडेसहा वाजता सोडली जात असे आणि मुंबईला त्याच दिवशी दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचत असे. मात्र आता या गाडीचे वेळापत्रक बदलले आहे.
ही गाडी मुंबईवरून आधीप्रमाणेच दुपारी बारा वाजता सोडली जाणार आहे पण ही गाडी चाळीसगाव येथे पंधरा मिनिट आधी आणि धुळ्याला अर्धा तास आधी पोहोचणार आहे.
आधी गाडी मुंबईवरून सुटल्यानंतर चाळीसगावला 7:10 मिनिटांनी येत असे मात्र आता सहा वाजून 55 मिनिटांनी येणार आहे, जामदा रेल्वे स्थानकावर साडेसात ऐवजी सव्वा सात वाजता येणार आहे, शिरुड येथे रात्री 8:06 ऐवजी 7:44 ला येणार आहे.
धुळे येथे रात्री 8:55 ऐवजी आठ वाजून पंचवीस मिनिटांनी पोहोचणार आहे. या गाडीच्या नवीन वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर हे नवीन वेळापत्रक कालपासून म्हणजेच 15 जुलै 2025 पासून लागू झाले आहे.
कोण कोणत्या स्थानकावर थांबणार?
या गाडीचे फक्त वेळापत्रक अंशतः चेंज करण्यात आले आहे, बाकी थांबे तेच आहेत. ही गाडी आधी प्रमाणेच या मार्गावरील दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड, नांदगाव, चाळीसगाव, जामदा आणि शिरूड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार अशी माहिती समोर आली आहे.