Mumbai Railway News : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. हे अपडेट मुंबई, दादर, कल्याण, नाशिक या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास आहे, कारण की रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एका विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की एक प्रवाशांच्या वाढलेल्या गर्दीसाठी उन्हाळी सुट्ट्यामध्ये मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रिवा दरम्यान एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

ही एक साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन आहे. ही साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन चार जुलै 2025 पर्यंत चालवले जाणार होते मात्र या गाडीला प्रवाशांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळतोय आणि याचमुळे या गाडीला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय रेल्वे विभागाकडून घेण्यात आला आहे.
परिणामी या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनला कोणत्या तारखेपर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार ? या संदर्भातील सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मुंबई – रीवा साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेनला किती दिवस मुदतवाढ मिळाली ?
खरे तर रीवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान चालवली जाणारी साप्ताहिक विशेष गाडी म्हणजे गाडी क्रमांक 02187 तीन जुलै 2025 पर्यंत चालवली जाणार होती मात्र आता या गाडीला 25 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते रिवा साप्ताहिक विशेष गाडीम्हणजे गाडी क्रमांक 02188 चार जुलै 2025 पर्यंत चालवली जाणार होती मात्र आता या गाडीला 26 सप्टेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पण या गाडीच्या वेळापत्रकात तसेच या गाडीच्या रचनेत कोणताच बदल झालेला नाही. महत्त्वाची बाब म्हणजे या गाडीचे स्टोपेज देखील तसेच ठेवण्यात आले आहेत.
या स्थानकावर थांबा मिळणार
रेल्वे विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई – रीवा विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील दादर कल्याण जंक्शन नाशिक रोड मनमाड भुसावळ खांडवा हरदा इटारसी जंक्शन पिपरीया, गदरवाडा, नरसिंहपुर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबा घेणार आहे.