Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक गुड न्यूज समोर आली आहे ती म्हणजे ईशान्य रेल्वे कडून एका नव्या रेल्वे गाडीची घोषणा करण्यात आली आहे. ही रेल्वे गाडी उद्यापासून अर्थातच 6 जुलै 2025 पासून रुळावर धावताना दिसणार आहे. ही एक साप्ताहिक विशेष गाडी राहणार आहे म्हणजेच ही नियमित गाडी राहणार नाही तर एका ठराविक कालावधीसाठी चालवली जाणारी साप्ताहिक विशेष गाडी असेल.
ही गाडी मुंबई ते कानपूर अन्वरगंज दरम्यान चालवली जाणार आहे. अशा परिस्थितीत आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याबाबतही आपण माहिती पाहणार आहोत.

कसं राहणार नव्या गाडीचे वेळापत्रक?
ईशान्य रेल्वेने मुंबई-कानपूर अन्वरगंज-मुंबई दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन चालवण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक संजीव शर्मा यांनी ईशान्य रेल्वे कडून चालवल्या जाणाऱ्या या नव्या विशेष गाडीची माहिती दिली.
रेल्वेने सांगितल्याप्रमाणे ही गाडी मुंबई येथील मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे. मुंबई सेंट्रल ते कानपूर अन्वरगंज साप्ताहिक विशेष गाडी (ट्रेन क्रमांक 08185) 6 जुलै ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे.
या काळात ही गाडी दर रविवारी मुंबई सेंट्रलवरून सकाळी 11 वाजता सोडली जाईल. ही ट्रेन सोमवारी दुपारी साडेतीन वाजता आपल्या गंतव्यस्थानी म्हणजेच कानपूर अन्वरगंज स्टेशनवर पोहोचेल.
परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर कानपूर अन्वरगंज – मुंबई सेंट्रल विशेष एक्सप्रेस ट्रेन म्हणजेच गाडी क्रमांक 08186 ही विशेष गाडी कानपूर अनवरगंज रेल्वे स्थानकावरून सात जुलै ते 29 सप्टेंबर पर्यंत चालवली जाईल. या काळात कानपुर अनवरगंज रेल्वे स्थानकातून ही गाडी प्रत्येक सोमवारी चालवली जाणार आहे.
या गाडीची पहिली फेरी सात जुलै 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजून 25 मिनिटांनी कानपूर अनवरगंज रेल्वे स्थानकातून रवाना होईल. दरम्यान आता आपण ही गाडी या मार्गावरील कोणकोणत्या स्थानावर थांबा घेऊ शकते याची माहिती पाहूयात.
कोण – कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
मीडिया रिपोर्ट नुसार ही गाडी बोरिवली, वापी, वलसाड, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, गंगापूर शहर, भरतपूर, मथुरा, मथुरा कॅन्ट, हाथरस, कासगंज, कन्नौज, बिल्हौर अशा काही महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेऊ शकते. तथापि या गाडीच्या थांब्याबाबत अधिकृत माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक आहे.