मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! दादर, कल्याण, नाशिकमार्गे ‘या’ शहरासाठी सुरू झाली नवीन एक्सप्रेस ट्रेन, रूट पहा…

रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी मुंबईसह नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की रेल्वेने अलीकडेच या भागातील प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतलाय. 

Published on -

Mumbai Railway News : जून महिना संपत असतानाच मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी मुंबईकरांसाठी रेल्वे प्रशासनाकडून एक विशेष गाडी सुरु करण्यात आली.

रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रिवा दरम्यान एक साप्ताहिक विशेष गाडी सुरू केली आहे. या गाडीमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय.

ही गाडी सीएसएमटी हून दादर पुढे कल्याण आणि मग नाशिक रोड मार्गे रीवापर्यंत धावते. मात्र ही विशेष गाडी फक्त 4 जुलै 2025 पर्यंत धावणार होती. दुसरीकडे या विशेष गाडीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय.

अजूनही ही गाडी हाउसफुल होऊन धावत आहे. त्यामुळे आता रेल्वे कडून या विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आलाय.

या तारखेपर्यंत धावणार सीएसएमटी – रीवा विशेष साप्ताहिक ट्रेन

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार रीवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान सुरू करण्यात आलेली साप्ताहिक ट्रेन (म्हणजेच गाडी क्रमांक 02187) 3 जुलै 2025 पर्यंत चालवली जाणार होती मात्र ही गाडी आता 25 सप्टेंबर 2025 पर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रिवा दरम्यान चालवली जाणारी साप्ताहिक विशेष ट्रेन (म्हणजेच गाडी क्रमांक 02188) 4 जुलै 2025 पर्यंत चालवली जाणार होती मात्र आता ही गाडी 26 सप्टेंबर 2025 पर्यंत चालवली जाणार आहे.

प्रवाशांसाठी आनंदाची बात अशी की या गाडीच्या रचनेत कोणताच बदल करण्यात आलेला नाही. शिवाय या गाडीचे वेळापत्रक आणि या गाडीचे अधिकृत थांबे देखील तेच ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान आता आपण ही गाडी या मार्गावरील कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेते याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत.

या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबणार विशेष एक्सप्रेस ट्रेन

रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सीएसएमटी ते रिवा दरम्यान चालवली जाणारी साप्ताहिक विशेष गाडी या मार्गावरील दादर, कल्याण, जंक्शन, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ,

खांडवा, हरदा, इटारसी जंक्शन, पिपरीया, गदरवाडा, नरसिंहपुर, जबलपूर, कटनी, मैहर आणि सतना या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेते.

नक्कीच आता ही एक्सप्रेस ट्रेन सप्टेंबर पर्यंत धावणार असल्याने या संबंधित रेल्वे स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना या साप्ताहिक विशेष गाडीचा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!