राजधानी मुंबईवरून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, 22 ऑक्टोबर पासून धावणार, कसा राहणार रूट अन टाईम टेबल

Mumbai Railway News : लवकरच दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात मुंबई पुणे सारख्या शहरांमधून नागरिक आपल्या मूळ गावाकडे परतत असतात. यंदाही मुंबई पुण्यात रोजगार, शिक्षण तसेच व्यवसायासाठी स्थायिक झालेली जनता दिवाळी सणाला आपल्या मूळ गावाला परतणार आहे.

यामुळे दरवर्षी दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. दरम्यान रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासन देखील दरवर्षी विशेष एक्सप्रेस गाड्यांची घोषणा करत असते.

यंदाही रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या संभाव्य अतिरिक्त गर्दीच्या अनुषंगाने विशेष एक्सप्रेस गाड्या चालवल्या जाणार आहेत.

दरम्यान मुंबई ते छत्तीसगड आणि छत्तीसगड ते मुंबई यादरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी देखील रेल्वे प्रशासनाकडून विशेष एक्सप्रेस गाडी चालवली जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबई येथील वांद्रे टर्मिनस ते लालकुवा रेल्वे स्टेशन दरम्यान ही विशेष साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून आज आपण याच एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोण-कोणत्या स्थानकावर थांबणार यासंदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार वेळापत्रक?

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर वांद्रे टर्मिनस- लालकुवा सुपरफास्ट साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस 22 ऑक्टोबर पासून चालवली जाणार आहे. ही ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून दर मंगळवारी सकाळी ११ वाजता सोडली जाणार आहे.

तसेच लालकुवा-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट साप्ताहिक विशेष गाडी 21 ऑक्टोबर पासून चालवली जाणार असून ही गाडी लालकुवा रेल्वे स्थानकावरून दर सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता सोडली जाणार आहे. या गाडीमुळे मुंबई ते उत्तराखंड दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

ण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार

पश्चिम रेल्वे मार्गावर चालवल्या जाणाऱ्या या दिवाळी विशेष साप्ताहिक ट्रेनला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे.

ही साप्ताहिक दिवाळी विशेष गाडी या मार्गावरील बोरिवली, वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा, सवाई माधोपूर, भरतपूर, मथुरा, हजरत निजामुद्दीन, गाझियाबाद, हापूर, अमरोहा, मुरादाबाद, रामपूर आणि रुद्रपूर सिटी या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.