मुंबईकरांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय ! ‘या’ तारखेला सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील 12 Railway Station वर थांबणार, कसा राहणार रूट ? पहा….

होळी सणाच्या आधीच मुंबईकरांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे. होळी सणाला होणाऱ्या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबईमधील लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम उत्तर या रेल्वेस्थानका दरम्यान साप्ताहिक विशेष गाडी सुरू करणार आहे.

Published on -

Mumbai Railway News : आज मार्च महिन्याची सुरवात झालीये अन आता देशात सणासुदीचा हंगाम देखील सुरू होणार आहे. येत्या काही दिवसांनी देशात होळीचा मोठा सण साजरा होणार आहे. दरम्यान, होळी सणाच्या आधीच मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची आणि अगदीच आनंदाची बातमी समोर येत आहे.

मुंबईतील रेल्वे प्रवाशांसाठी कोकण रेल्वेच्या माध्यमातून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. ही गाडी कोकण रेल्वे मध्य रेल्वेच्या समन्वयाने सुरू करणार असून या गाडीमुळे मुंबईकरांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल अशी आशा आहे.

ही विशेष गाडी मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम उत्तर दरम्यान चालवली जाणार आहे. या गाडीला महाराष्ट्रातील तब्बल 12 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत, आज आपण कोकण रेल्वेच्या माध्यमातून अन मध्य रेल्वेच्या समन्वयाने सुरू केल्या जाणाऱ्या याच विशेष एक्सप्रेस ट्रेनची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक कसे असेल आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार ? याच बाबत आता आपण माहिती पाहणार आहोत.

कसं असणार विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक ?

लोकमान्य टिळक टर्मिनस अर्थात एलटीटी ते तिरुअनंतपुरम उत्तर दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन एक साप्ताहिक ट्रेन राहणार आहे. अर्थात ही गाडी आठवड्यातून एकदा चालवली जाईल.

गाडी क्रमांक 01063 ही विशेष एक्सप्रेस ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 6 मार्च 2025 आणि 13 मार्च 2025 रोजी सायंकाळी चार वाजता सोडली जाणार आहे. तसेच गाडी क्रमांक 01064 तिरुअनंतपुरम उत्तर येथून 8 मार्च 2025 आणि 15 मार्च 2025 रोजी सायंकाळी चार वाजता सोडली जाणार आहे.

विशेष ट्रेन कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ?

कोकण रेल्वे मार्गावर चालवली जाणारी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. या गाडीला महाराष्ट्रातील तब्बल 12 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर केला जाणार आहे.

मध्य रेल्वेच्या समन्वयाने चालवल्या जाणाऱ्या या विशेष ट्रेनला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड या राज्यातील 12 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा राहणार अशी माहिती समोर आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe