Mumbai Railway News : लवकरच मार्च महिन्याची सांगता होणार आहे. मार्च महिन्याचे सांगता होण्यास आता फक्त दोन ते तीन दिवसांचा काळ बाकी असून लवकरच देशात उन्हाळी सुट्ट्यांना सुरुवात होणार आहे. देशात उन्हाळी सुट्ट्यांना सुरुवात झाली की अनेक जण आपल्या मूळ गावाकडे परतत असतात.
त्यामुळे या काळात नेहमीच रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. मुंबई मधूनही अनेक जण आपल्या मूळ गावाला जाण्याच्या तयारीत आहेत आणि अशाच लोकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे मुंबई ते चेन्नई आणि मुंबई ते कन्याकुमारी दरम्यान समारं स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे.

यामुळे या रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच येतील असा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं असणार वेळापत्रक
मध्य रेल्वेच्या माध्यमातून मुंबई ते चेन्नई आणि मुंबई ते कन्याकुमारी दरम्यान चालवली जाणारी समर स्पेशल ट्रेन सोलापूर मार्गे धावणार आहे. यामुळे सोलापूर मधील जनतेला जलद गतीने पुणे आणि मुंबईकडे प्रवास करता येणार आहे तसेच चेन्नई आणि कन्याकुमारीलाही सोलापूर मधील जनतेला जलद गतीने पोहोचता येणार आहे.
वेळापत्रक बाबत बोलायचं झालं तर मुंबई चेन्नई समर स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक 01015) मुंबईहून बुधवार 09, 16, 23, 30 एप्रिल रोजी धावेल. ही मुुंबई-चेन्नई एक्स्प्रेस मुंबईहून बुधवारी रात्री 12.20 वाजता सुटेल. सोलापूर स्थानकावर सकाळी 7.30 वाजता येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन 7.35 वाजता चेन्नईकडे रवाना होईल.
चेन्नईला ती रात्री 11.30 वाजता पोहोचेल. तसेच, चेन्नई मुंबई समर स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक 01016) चेन्नई सेंट्रलहून गुरुवार 10, 17, 24 एप्रिल आणि 01 मे रोजी धावणार आहे. ही चेन्नई-मुंबई एक्स्प्रेस गुरुवारी पहाटे चार वाजता चेन्नईहून निघेल. सोलापूरला रात्री 8.10 वाजता येईल.
पाच मिनिटांचा थांबा घेऊन, 8.15 वाजता मुंबईकडे रवाना होईल, तर मुंबईला शुक्रवारी पहाटे 4.15 वाजता पोहोचणार आहे. म्हणजेच मुंबई चेन्नई एक्सप्रेस ट्रेनच्या एकूण चार फेऱ्या आणि चेन्नई मुंबई एक्सप्रेस ट्रेनच्या एकूण चार अशा आठ फेऱ्या होणार आहेत.
मुंबई कन्याकुमारी विशेष ट्रेनचे वेळापत्रक कस असणार?
मुंबई-कन्याकुमारी (गाडी क्रमांक 01005) ही विशेष एक्सप्रेस ट्रेन 9 एप्रिल ते 25 जून दरम्यान चालवली जाणार असून या काळात या गाडीच्या 12 फेर्या होतील. या काळात गाडी क्रमांक 01005 ही विशेष एक्सप्रेस ट्रेन मुंबईहून बुधवारी रात्री 12.30 वाजता निघेल.
सोलापूरला सकाळी 8.30 वाजता येईल. पाच मिनिटांचा थांबा घेऊन 8.35 वाजता रवाना होईल. कन्याकुमारीला गुरुवारी दुपारी 1.45 वाजता पोहोचेल.
तसेच गाडी क्रमांक 01006 कन्याकुमारी-मुंबई एक्स्प्रेस 10 एप्रिल ते 26 जूनदरम्यान चालवले जाणार असून या काळात या गाडीच्या एकूण 12 फेर्या होतील. ही ट्रेन कन्याकुमारीहून दुपारी 4.45 वाजता निघेल. सोलापूरला शुक्रवारी रात्री 8.10 वाजता येईल.
पाच मिनिटांचा थांबा घेऊन 8.15 वाजता रवाना होईल. मुंबईला शनिवारी पहाटे 4.15 वाजता पोहोचणार आहे. यामुळे मुंबई ते कन्याकुमारी दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.