मुंबई, ठाणे, कल्याणवासियांना रेल्वेच मोठ गिफ्ट ! ‘या’ मार्गावर सुरू झाली नवीन सुपरफास्ट ट्रेन; गाडीला कुठं राहणार थांबा? पहा…

Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबई ही राज्याची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईमध्ये कामानिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक स्थायिक झाली आहेत. यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील लोकांचा देखील समावेश आहे.

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव तसेच नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील बहुतांशी लोक कामानिमित्त राजधानी मुंबईत आपले बस्तान बसवून आहेत.

विशेषता धुळे जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात नागरिक कामानिमित्त तसेच शिक्षणासाठी मुंबईमध्ये राहत आहेत. दरम्यान आता धुळेकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी एक अति महत्त्वाचा निर्णय रेल्वेच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. धुळे ते मुंबई रोजाना हजारो प्रवासी प्रवास करतात.

या पार्श्वभूमीवर धुळे ते मुंबई एक विशेष एक्सप्रेस गाडी सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवाशांची होती. दरम्यान आता 30 एप्रिल 2023 रोजी धुळेकरांची ही मागणी पूर्ण झाली असून धुळे ते दादर स्पेशल एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

हे पण वाचा :- मोचा चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार का? पहा काय म्हणतंय हवामान विभाग

यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी धुळे दादर रेल्वे सुरू झाली असून ही ट्रेन प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली. तसेच या ट्रेनला रेल्वे प्रवाशांनी पसंती दाखवली तर ही प्रायोगिक तत्त्वावरील गाडी नियमित केली जाईल असे आश्वासन देखील यावेळी दिले.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की गेल्या अनेक वर्षांपासून धुळेकरांनी मुंबईसाठी एक विशेष गाडी सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. यासाठी खासदार डॉक्टर सुभाष बाबा भामरे यांनी देखील पाठपुरावा केला. अखेरकार खासदार महोदय यांचा पाठपुरावा यशस्वी झाला असून आता धुळे ते दादर प्रायोगिक तत्त्वावर ट्रेन सुरू करण्यात आली आहे.

यावेळी खासदार भामरे यांनी धुळे ते दादर एक्सप्रेस गाडी सुरू झाली असून आता भविष्यात धुळ्याहून पुण्याला जाण्यासाठी एक एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा मानस सरकारचा असल्याचे सांगितले. तसेच धुळे ते दादर एक्सप्रेस ट्रेनला प्रवाशांनी प्रतिसाद दिल्यास ही गाडी नियमित केली जाऊ शकते असे देखील त्यांनी सांगितले आहे.

हे पण वाचा :- अहमदनगर, पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता ! भारतीय हवामान विभागाचा इशारा

कस राहणार वेळापत्रक?

रेल्वे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार धुळे – दादर रेल्वे ही दि. 30 एप्रिल ते दि. 30 जुनदरम्यान धुळे येथून सोमवार, मंगळवार आणि शनिवारी सकाळी 6.30 वाजता दादरच्या दिशेने रवाना होणार आहे. तसेच ही गाडी दुपारी 13.15 वाजता दादरला पोहचेल. तर दादर येथून ही विशेष गाडी रविवार, सोमवार आणि शुक्रवारी दुपारी 16.15 ला सुटेल तर धुळे येथे रात्री 23.25 ला पोहचणार आहे.

कोणत्या स्टेशनवर थांबणार?

मिळालेल्या माहितीनुसार धुळे-दादर रेल्वे शिरूड, जामधा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा हवामान अंदाज; अवकाळीच संकट अजून गेले नाही, पुढील 3 दिवस ‘या’ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस; वाचा सविस्तर

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe