मुंबईहून उज्जैनला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर ! सुरु होणार नवीन तेजस एक्सप्रेस, ‘या’ 7 Railway Station वर थांबणार नवीन ट्रेन

Published on -

Mumbai Railway News : मध्यप्रदेश राज्यातील श्री क्षेत्र उज्जैन हे एक प्रमुख ज्योतिर्लिंग आहे. या ठिकाणी संपूर्ण देशभरातील शिवभक्त बाबा महाकालच्या दर्शनासाठी गर्दी करत असतात. श्रीक्षेत्र उज्जैनला जाणाऱ्या मुंबईकरांची संख्या देखील फारच उल्लेखनीय आहे आणि म्हणूनच पश्चिम रेल्वे कडून आता एक नवीन एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता पश्चिम रेल्वे कडून मुंबई ते इंदोर दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवली जाणार आहे. मुंबई ते इंदोर दरम्यान विशेष तेजस एक्सप्रेस चालवली जाणार असून ही गाडी येत्या तीन दिवसांनी म्हणजेच 23 जुलै 2025 पासून सुरू होईल.

दरम्यान आता आपण मुंबई ते इंदोर दरम्यान धावणाऱ्या याच विशेष तेजस एक्सप्रेस ट्रेनच्या संपूर्ण वेळापत्रकाची तसेच ही गाडी या मार्गावरील कोण कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार याबाबतची माहिती जाणून घेऊयात. 

मुंबई – इंदोर विशेष तेजस एक्सप्रेसचे वेळापत्रक कसे असणार?

मुंबई – इंदोर विशेष तेजस एक्सप्रेस त्रि साप्ताहिक राहणार आहे म्हणजेच ही गाडी आठवड्यातून तीन दिवस चालवले जाईल. ही ट्रेन 23 जुलै ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत चालवली जाणार असून या गाडीच्या एकूण 34 फेऱ्या होणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वे कडून देण्यात आली आहे.

मुंबई सेंट्रल- इंदूर तेजस स्पेशल एक्सप्रेस ट्रेन (गाडी क्रमांक 09085) ही विशेष गाडी या कालावधीत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

ही गाडी आठवड्यातील हे तीन दिवस मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावरून रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी सोडली जाईल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी एक वाजता ही गाडी इंदोर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 09086 म्हणजे इंदूर-मुंबई सेंट्रल तेजस स्पेशल प्रत्येक मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी इंदोर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

आठवड्यातील हे तीन दिवस ही गाडी सायंकाळी पाच वाजता इंदूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार असून दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी ही गाडी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. 

मुंबई – इंदोर विशेष गाडीला उज्जैनला थांबा 

23 जुलै ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीत चालवली जाणारी मुंबई – इंदोर तेजस विशेष एक्सप्रेस ट्रेन या मार्गावरील उज्जैन रेल्वे स्थानकावर थांबणार आहे.

यामुळे बाबा महाकालच्या दर्शनासाठी जाणाऱ्या शिवभक्तांना आणि सर्वसामान्य प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. इंदूर – मुंबई विशेष तेजस एक्सप्रेस या मार्गावरील उज्जैन, रतलाम, दाहोद, वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!