Mumbai Railway News : मुंबईमधील चाकरमान्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरं पाहता मुंबईमध्ये कामानिमित्त पुण्यातून रोजाना हजारो प्रवासी प्रवास करत असतात. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी देखील पुण्याहून मुंबईला जातात.
तसेच मुंबईहूनही मोठ्या प्रमाणात पुण्याकडे प्रवासी प्रवास करतात. दरम्यान मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई पुणे या रेल्वे मार्गावर वाढणारी अतिरिक्त गर्दी पाहता मध्य रेल्वे एक मोठा कौतुकास्पद असा निर्णय घेतला आहे.
मध्य रेल्वेने आता मुंबई-पुणे दरम्यान प्रवास करण्यासाठी अति महत्त्वाची अशी सिंहगड एक्सप्रेस बाबत एक निर्णय घेतला आहे. आता सिंहगड एक्सप्रेसच्या डब्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
हे पण वाचा :- मुंबईमधील मेट्रो प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो प्रशासनाचा मोठा निर्णय, आता…..
मध्य रेल्वेने सिंहगड एक्सप्रेस ला एक अतिरिक्त डबा जोडण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे आता सिंहगड एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या 16 होणार आहे.
मध्य रेल्वेने याबाबत अधिक माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता सिंहगड एक्सप्रेसमध्ये अर्थातच ट्रेन क्रमांक 11009/11010 मध्ये एक द्वितीय श्रेणी चेअर कार (नॉन-एसी) कोच जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सिंहगड एक्सप्रेसची प्रवासी संख्या आता वाढणार आहे.
मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी एक मे 2023 पासून होणार आहे. दरम्यान रेल्वेने घेतलेल्या या निर्णयानंतर सिंहगड एक्सप्रेसला आता एक वातानुकूलित चेअर कार, १३ द्वितीय श्रेणी चेअर कार, एक लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कारसह एकूण १६ डबे राहणार आहेत.
हे पण वाचा :- 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! इस्रो मध्ये निघाली भरती, आजच करा अर्ज
निश्चितच या निर्णयामुळे सिंहगड एक्सप्रेस ने मुंबई ते पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे या निर्णयाचे प्रवाशांच्या माध्यमातून स्वागत केले जात आहे. वास्तविक मुंबई पुणे दरम्यान प्रवास करण्यासाठी अनेक एक्सप्रेस ट्रेन धावत आहेत.
यामध्ये डेक्कन क्वीन चा देखील समावेश आहे. तसेच नुकत्याच रेल्वेच्या ताफ्यात सामील झालेल्या मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा देखील पुण्याच्या प्रवाशांना मुंबईकडे प्रवास करताना फायदा होत आहे.
मात्र मुंबई पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही खूपच अधिक आहे. यामुळे सिंहगड एक्सप्रेस ने देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करतात. म्हणून सिंहगड एक्सप्रेसमध्ये होणारी नेहमीची गर्दी पाहता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.
हे पण वाचा :- शेवटी निर्णय झालाच ! ‘या’ तारखेला जाहीर होणार 10वी, 12वी चे निकाल, वाचा सविस्तर