मुंबईकरांसाठी खुशखबर ! ऑगस्ट महिन्यात CSMT वरून सुरु होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, राज्यातील 22 स्थानकावर थांबणार

मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईवरून एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.

Published on -

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुढील महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यात मुंबईकरांसाठी मध्य रेल्वे कडून विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. खरंतर मध्य रेल्वे कडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई मधून विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.

मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड स्टेशन दरम्यान देखील ऑगस्टमध्ये विशेष गाडी चालवली जाणार आहे. मुंबईहून कोकणात आणि कोकणातून मुंबईला येणाऱ्या प्रवाशांची संख्या फारच उल्लेखनीय असते.

विशेषता गणेशोत्सव आणि होळी सारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्यांची संख्या वाढत असते. यामुळे आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आता मध्य रेल्वे कडून ऑगस्टमध्ये सीएसएमटी ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे ही गाडी 22 रेल्वे स्टेशनवर थांबणार आहे आणि म्हणूनच या गाडीचा कोकणातील नागरिकांना मोठा फायदा होईल अशी आशा आहे.  

कसे असणार विशेष गाडीचे वेळापत्रक 

सीएसएमटी – सावंतवाडी रोड स्टेशन दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस गाडी 22 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2025 दरम्यान चालवली जाईल. या कालावधीत सीएसएमटी सावंतवाडी रोड म्हणजे ट्रेन नंबर 01151 ही गाडी मुंबई सीएसएमटी येथून 00.20 वाजता सोडली जाणार आहे आणि त्याच दिवशी ही गाडी दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे.

तसेच परतीच्या प्रवासात ट्रेन नंबर 01152 ही गाडी दररोज दुपारी तीन वाजून 35 मिनिटांनी सावंतवाडी रोड येथून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजून 35 मिनिटांनी ही गाडी सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. 

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन विशेष एक्सप्रेस 

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी रोड दरम्यान चालवली जाणारी विशेष एक्सप्रेस ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे , आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड,

नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. म्हणजेच कोकण रेल्वे मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे. याचा मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!