एप्रिल महिन्यात राज्यातील रेल्वे प्रवाशांना मिळणार मोठी भेट ! मुंबईहुन ‘या’ शहरासाठी सुरु होणार ट्रेन, कसं असणार वेळापत्रक ?

मुंबई ते करमळी यादरम्यान सुद्धा कोकण रेल्वे कडून विशेष गाडी चालवले जाणार असून यामुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक, आणि ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Mumbai Railway News : येत्या काही दिवसांनी उन्हाळी सुट्ट्या सुरू होणार आहेत आणि याच उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगाने राज्यातील विविध रेल्वे मार्गांवर रेल्वे कडून स्पेशल गाड्या सुरू केल्या जात आहेत. कोकण रेल्वे देखील वेगवेगळ्या स्टेशनंदरम्यान विशेष गाड्या सुरू करत आहे.

मुंबई ते करमळी यादरम्यान सुद्धा कोकण रेल्वे कडून विशेष गाडी चालवले जाणार असून यामुळे मुंबईमधील रेल्वे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

उन्हाळी सुट्ट्यांमध्ये या मार्गावर नेहमीच गर्दी असते आणि याच गर्दीच्या अनुषंगाने यावेळी कोकण रेल्वेच्या माध्यमातून स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान आता आपण या स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक, आणि ही गाडी कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक ?

कोकण रेल्वेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबई सीएसएमटी-करमळी विशेष ट्रेन (गाडी क्र. 01151) ही एक साप्ताहिक ट्रेन राहणार आहे. ही गाडी 10 एप्रिल 2025 ते 05 जून 2025 दरम्यान चालवली जाणार आहे.

ही गाडी या काळात दर गुरुवारी मुंबई सीएसएमटीहून रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी सुटणार आहे आणि त्याच दिवशी दुपारी दीड वाजता गोव्यात करमळीला पोहोचणार आहे.

परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक 01152 अर्थात करमाळी – मुंबई सीएसएमटी विशेष ट्रेन 10 एप्रिल 2025 ते 5 जून 2025 दरम्यान चालवली जाणार आहे.

ही गाडी सुद्धा आठवड्यातून एक दिवस धावणार आहे. ही ट्रेन करमळीहून दर गुरुवारी दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी सुटणार आहे आणि दुसर्‍या दिवशी पहाटे 3.45 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचणार आहे.

स्पेशल ट्रेन कुठे थांबणार?

कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या स्पेशल गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe