मुंबईच्या ‘या’ रेल्वे स्थानकावरून युपीसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘त्या’ 5 Railway स्थानकावर थांबा घेणार

रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून एलटीटी गोरखपुर स्पेशल गाडी 13 मार्च पासून ते 24 मार्च 205 पर्यंत चालवली जाणार आहे. या दिवशी ही गाडी एलटीटी येथून सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता गोरखपूरला पोहोचणार आहे.

Updated on -

Mumbai Railway News : यंदा आपल्या देशात 14 मार्चला होळीचा मोठा सण साजरा होणार आहे. पण महाराष्ट्रात मात्र हो‌ळी 13 मार्चला आहे अन धुलिवंदन दुसऱ्या दिवशी म्हणजेच 14 मार्चला आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे या सणासाठी मोठ्या प्रमाणात लोक मूळ गावी जात आहेत. मूळ गावी जाण्यासाठी आत्तापासूनच नागरिकांची मोठी गर्दी दिसत आहे.

या काळात मुंबई, पुणे वरून आपल्या मूळ गावी परतणाऱ्यांची संख्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाढत चालली आहे. त्यामुळे नियमित रेल्वेगाड्यांना गर्दी होत आहे अन हे बघून रेल्वेने विशेष गाडीची सोय केली आहे. याच अनुषंगाने मुंबईहून काही विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.

मुंबई ते गोरखपुर यादरम्यान सुद्धा विशेष गाडी चालवण्याचे रेल्वेने नियोजन आखले आहे. मुंबई येथील लोकमान्य टिळक टर्मिनस वरून ही गाडी चालवली जाणार असून आज आपण याच विशेष गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी राज्यातील कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असणार स्पेशल गाडीचे वेळापत्रक?

रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून एलटीटी गोरखपुर स्पेशल गाडी 13 मार्च पासून ते 24 मार्च 205 पर्यंत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी मुंबई येथून गुरुवार आणि सोमवारी सोडली जाईल.

या दिवशी ही गाडी एलटीटी येथून सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री आठ वाजता गोरखपूरला पोहोचणार आहे. या ट्रेनच्या परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही विशेष ट्रेन गोरखपुर रेल्वे स्थानकावरून 11 मार्चपासून ते 22 मार्च पर्यंत चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी मंगळवार आणि शनिवारी सोडली जाईल. या दिवशी ही गाडी गोरखपूर येथून सायंकाळी सात वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांनी पोहोचणार आहे. या विशेष गाडीच्या एकूण आठ फेऱ्या होणार आहेत. ही एक द्विसाप्ताहिक गाडी राहणार आहे. म्हणजेच ही गाडी आठवड्यातून दोन दिवस चालवली जाणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?

रेल्वेने सांगितल्याप्रमाणे ही विशेष गाडी महाराष्ट्रातील पाच महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ या राज्यातील महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबणार असून या भागातील प्रवाशांना या गाडीचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे.

शिवाय ही गाडी खंडवा, इटारसी, रानी कमलापति-भोपाळ, बीना, विरांगना लक्ष्मीबाई-झांसी, उरई, गोविन्दपुरी, प्रयागराज, अयोध्या, मनकापुर आणि खलीलाबाद येथे सुद्धा थांबे घेणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe