Good News : मुंबईहुन धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! कोण कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार ?

मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही नवीन गाडी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांना जोडणार आहे.

Published on -

Mumbai Railway News : पश्चिम रेल्वेने राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावर एक नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी पुढील महिन्यात म्हणजे जून महिन्यात सुरू होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम रेल्वे मार्गावरील मुंबई सेंट्रल आणि गांधीधाम या दोन महत्त्वाच्या रेल्वे स्थानकादरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. मुंबई सेंट्रल गांधीधाम ही नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन 2 जून 2025 पासून सुरु होणार आहे.

ही विशेष गाडी राज्यातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे आणि यामुळे महाराष्ट्र ते गुजरात यादरम्यानचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे.

अशा परिस्थितीत, आता आपण मुंबई सेंट्रल – गांधीधाम विशेष एक्सप्रेस ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ? या संदर्भातील डिटेल माहिती जाणून घेणार आहोत.

कसं असणार वेळापत्रक ?

मुंबई सेंट्रल – गांधीधाम विशेष एक्सप्रेस ट्रेन 2 जून 2025 पासून सुरु होणार आहे आणि ही विशेष गाडी 30 जून 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या काळात मुंबई सेंट्रल – गांधीधाम विशेष एक्सप्रेस ट्रेन प्रत्येक सोमवारी मुंबई सेंट्रल येथून रात्री 23:20 वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजून 55 मिनिटांनी गांधीधाम येथे पोहोचणार आहे.

यासोबतच, गांधीधाम-मुंबई सेंट्रल विशेष गाडी 3 जून 2025 ते 1 जुलै 2025 या कालावधीत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी प्रत्येक मंगळवारी गांधीधाम रेल्वे स्थानकावरून सोडले जाणार आहे.

मंगळवारी ही गाडी 18:55 वाजता गांधीधाम रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 07:30 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे. या गाडीमुळे मुंबई ते गांधीधाम हा प्रवास वेगवान आणि सुरक्षित होईल असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केलाय.

ही विशेष गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार ?

मुंबई सेंट्रल-गांधीधाम विशेष गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा देणार आहे. ही गाडी दोन्ही दिशांना बोरीवली, वापी, सूरत, वडोदरा, आनंद, अहमदाबाद, विरमगाम, समाखियाली आणि भचाऊ या स्थानकांवर थांबेल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe