रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! गणेशोत्सवानिमित्त मुंबईमधील ‘या’ स्थानकावरून सुरु होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन

मुंबईहून कोकणात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. विशेषतः ज्यांना गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून कोकणात जायचे असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे.

Published on -

Mumbai Railway : महाराष्ट्रासहीत संपूर्ण भारतात दरवर्षी गणेशोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळते. विशेषतः मुंबईत आणि कोकणात गणेशोत्सवाची अधिक धूम असते, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईत काम करणारे अनेक चाकरमानी आपल्या गावी परततात. दरम्यान याही वर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतून अनेक जण कोकणातील आपल्या मूळ गावाकडे परतणार आहेत.

दरम्यान याच कोकणातील चाकरमान्यांसाठी आता रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर यावर्षी 27 ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत आहे. म्हणजेच गणरायाच्या आगमनासाठी आता एक महिना आणि दहा दिवसांचा काळ बाकी आहे.

यामुळे आतापासूनच श्री गणरायाच्या स्वागतासाठी एस टी महामंडळ आणि रेल्वे सज्ज झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवाच्या काळात तब्बल 5000 हून अधिक जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत.

दुसरीकडे आता रेल्वे देखील मुंबईहून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी तीनशे अतिरिक्त गाड्या चालवणार असल्याची माहिती हाती आली आहे. मध्य रेल्वे कडून या संदर्भातील एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे आणि या परिपत्रकात गणेशोत्सवाच्या काळात मध्ये रेल्वे 300 हून अधिक विशेष रेल्वे गाड्या चालवणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

या रेल्वे स्थानकावरून सोडल्या जाणार विशेष गाड्या 

 रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने 22 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या काळात गणपती विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वे कडून कोकण रेल्वे मार्गावर 300 पेक्षा जास्त गणपती स्पेशल रेल्वेच्या फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.

या विशेष गाड्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दिवा, दादर या स्थानकावरून सोडण्यात येणार आहेत. कोकण रेल्वे मार्गावर मध्य व पश्चिम रेल्वेकडून या ज्यादा रेल्वेगाड्या सोडण्यात येणार अशी माहिती समोर आली आहे.

यामुळे मुंबईहून कोकणात जाणाऱ्या आणि कोकणातून मुंबईला येणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात या विशेष गाड्यांमुळे प्रवाशांचा प्रवास वेगवान होईल अशी आशा आहे. 

एसटी महामंडळ सुरू करणार अतिरिक्त बसेस 

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवाच्या काळात तब्बल 5000 अतिरिक्त बसेस सोडल्या जाणार असल्याची माहिती दिली आहे. यामुळे गणेशोत्सवाला गावी जाणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे.

एसटी महामंडळाच्या बसेस साठी आरक्षण करायचे असेल तर नागरिकांना www.npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे ऑनलाइन आरक्षण करता येईल अशी माहिती सुद्धा महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून समोर आली आहे. तसेच या जादा बसेसचे आरक्षण ऑफलाइन पद्धतीने सुद्धा होणार आहे, मात्र यासाठी बसस्थानकावर जावे लागणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!