Mumbai Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाची शाळा येत्या 16 तारखेपासून सुरू होणार आहेत. दुसरीकडे सीबीएसई बोर्डाची शाळा नवजीवन पासून सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सध्या पालक आपल्या पाल्यांच्या ऍडमिशन साठी चांगल्या शाळेचा शोध घेत आहेत.
अशा परिस्थितीत आज आपण मुंबईतील एका प्रतिष्ठित खाजगी शाळेची माहिती जाणून घेणार आहोत. देशाच्या आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राज्य राजधानी मुंबई 2003 साली अंबानी परिवाराकडून एक नवीन खाजगी शाळा सुरु करण्यात आली.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल हीच ती शाळा. ही शाळा अवघ्या 22 वर्षांच्या काळात भारतातील एक आघाडीची खासगी शैक्षणिक संस्था बनली आहे.
2003 साली नीता अंबानी यांनी या स्कूलची स्थापना केली आणि आज या संस्थेची उपाध्यक्ष म्हणून ईशा अंबानी कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
या शाळेत अनेक सेलिब्रिटींची मुलं शिकतात हे या शाळेचे सर्वात मोठे विशेष वैशिष्ट्य आहे. अशा परिस्थितीत आज आपण या शाळेची फी किती आहे ? याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत.
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची फी किती आहे?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या खाजगी शाळेत IGCSE, ICSE आणि IBDP अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या शाळेत बालवाडीपासून ते 12 वीपर्यंत दर्जेदार शिक्षण दिले जाते आणि येथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
इथे शालेय शिक्षणाबरोबरच 21व्या शतकातील कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित करण्यावर भर दिला जातो असे म्हणतात. बालवाडीपासून ते बारावीपर्यंत या शाळेची वार्षिक फी 1.4 लाखांपासून ते 20 लाख रुपये इतकी आहे. या फी मध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश, वाहतूक सुविधा दिली जाते.
वर्गनिहाय फी किती आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, एलकेजी ते सातवीसाठी 1.7 लाख, आठवी ते दहावी 5.9 लाख, तर अकरावी-बारावीसाठी 9.65 लाख रुपये इतकी फी आकारली जाते. या शाळेत विज्ञान व संगणक प्रयोगशाळा, ग्रंथालय, मोठे क्रीडांगण यासारख्या अनेक आधुनिक आणि हायटेक सुविधा आहेत.
या शाळेत अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटींची मुले शिकलेली आहेत. आकाश अंबानी, सारा अली खान, आर्यन खान, अनन्या पांडे अशी असंख्य सेलिब्रिटींची मुलं या शाळेतून शिकलेली आहेत.